महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

योगी आदित्यनाथ आणि उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा; रिपाइंची मागणी - Uddhav Thackeray

महिला अत्याच्यांराच्या घटनांविरोधात आरपीआय तर्फे औरंगाबादच्या क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी योगी आदित्यनाथ आणि उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आरपीआय तर्फे करण्यात आली आहे.

आरपीआय तर्फे औरंगाबादच्या क्रांतिचौकात निदर्शने
Protests by RPI at Kranti Chowk, Aurangabad

By

Published : Oct 13, 2020, 12:40 PM IST

Updated : Oct 13, 2020, 2:06 PM IST

औरंगाबाद- हाथरस प्रकरणात योगी सरकारने तात्काळ राजीनामा देण्याची मागणी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात करण्यात आली. महिला अत्याच्यांराच्या घटनांविरोधात आरपीआय तर्फे औरंगाबादच्या क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली.

आरपीआय तर्फे औरंगाबादच्या क्रांती चौकात निदर्शने
आरपीआय केंद्रात भाजपसोबत असले तरी आम्ही महिला अत्याचाराविरोधात आहोत, त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता असूनही आम्ही त्यांचा निषेध करतो. यासोबतच योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी करतो, असे आरपीआयचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ यांनी सांगितले. देशात महिला अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. उत्तर प्रदेशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. तसेच महाराष्ट्रात देखील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील राजीनामा दिला पाहिजे, अशा विविध मागण्यांसाठी आरपीआयच्या वतीने क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली.

तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हाथरसच्या घटनेवरून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. हाथरसच्या पीडितेच्या घरी भेट देत असताना बलरामपूर येथेच झालेल्या घटनेतील पीडितेबाबत काँग्रेसने एक शब्दही काढला नाही. काँग्रेसने असा भेदभाव करू नये, असा इशारा आरपीआयच्या वतीने देण्यात आला. यासोबतच, महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही आरपीआय तर्फे करण्यात आली आहे.

Last Updated : Oct 13, 2020, 2:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details