महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाळूजमध्ये अज्ञात वाहनांच्या धडकेत तरुणाचा मृत्यू - man

कंपनीमधून कामावरून घरी परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रमोद बाबूलसिंग राठोड असे मृत तरुणाचे नाव आहे.

प्रमोद बाबूलसिंग राठोड

By

Published : Jun 22, 2019, 5:06 PM IST

औरंगाबाद -कंपनीमधून कामावरून घरी परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री स्टरलाईट कंपनी समोर घडली आहे. प्रमोद बाबूलसिंग राठोड असे मृत तरुणाचे नाव आहे.


रांजणगाव भागातील एका कंपनीत कामगार म्हणून प्रमोद कामाला होता. कंपनीतील काम संपल्यावर तो रात्री त्याच्या दुचाकीवरून घरी बकवाल नगर कडे जात होता. त्यावेळी अचानक स्टरलाईट कंपनी जवळ भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली आणि वाहन तेथून पसार झाले.


एका रिक्षाचलकाने गंभीर जखमी प्रमोदला रिक्षातून शहरातील घाटी रुग्णालयात हलवले. मात्र उपचार सुरु असताना मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे.

प्रमोद बाबूलसिंग राठोड
या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास हवलदार एस.जे.भागडे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details