औरंगाबाद -पावसाळ्यात वीज पडून जीवित आणि वित्त हानी अधिक होते. आता जीवित हानी होऊ नये यासाठी 'दामिनी' ( Damini App ) धावून येणार आहे. दामिनी म्हणजे पोलिसांचे महिला मदत पथक अस वाटत असेल, किंवा ही दामिनी एखादी महिला असेल असं वाटत असेल तर, तसं नसून भारत सरकारने ( Central Governmenr Damini Application ) तयार केलेलं एक अॅप आहे, जे वीज पडण्याच्या 15 मिनिटं आधी आपल्याला त्या संबंधी सूचना देणार आहे.
मदतीला धावणार 'दामिनी' अॅप- जून ते सप्टेंबर महिला तर कुठे नोव्हेंबर महिन्यापर्यंत पावसाच्या सरी कोसळत असतात. मात्र, त्यावेळी विजेचा कडकडाट अनेक वेळा सोबत असतो. अशा स्थितीत वीज पडून अनेक वेळा, मनुष्य आणि जनावरांची जीवित हानी होते. त्याचा आकडा अधिक असतो. त्यामुळेच भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने दामिनी नावाच अँप तयार केलं आहे. हे अँप 30 ते 40 किलोमीटर अंतरावर कुठे वीज पडेल याबाबत 15 मिनिटं आधी इशारा देणार आहे. जीपीएस प्रणालीवर हे अँप कार्यान्वित असणार असून पावसाळ्यात ठराविक वेळेला हे अँप वीज पडणार आहे का? किंवा नाही या बाबत अलर्ट देत राहणार आहे.