महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद : गाडीवर उभं राहून मद्यप्राशन करत गुंडांचे मध्यरात्री भररस्त्यात नृत्य - औरंगाबाद गुन्हेवार्ता बातमी

गारखेडा परिसरातील कुख्यात गुन्हेगार शेख जावेद ऊर्फ टिप्या शेख मकसूदचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये मध्यरात्री भररस्त्यात तरुणीसोबत तो कारवर डान्स करत सिगारेट आणि बियर पिताना दिसत आहे. सर्व सामान्यांना खाकीचा धाक दाखवणारे पोलीस भररस्त्यात धुडगूस घालणाऱ्या या गुन्हेगारावर कारवाई कधी करणार, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

गाडीवर उभं राहून मद्यप्राशन करत गुन्हेगारांचे मध्यरात्री भररस्त्यात नृत्य
गाडीवर उभं राहून मद्यप्राशन करत गुन्हेगारांचे मध्यरात्री भररस्त्यात नृत्य

By

Published : Oct 23, 2020, 3:35 PM IST

औरंगाबाद -रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा भररस्त्यात एका तरुणीसोबत कारवर उभं राहून डान्स केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हातात बियारची बाटली आणि सिगरेट ओढत आपल्या मित्रांसोबत मोठ्या आवाजात भर रस्त्यात गाण्याच्या तालावर ठेका धरल्याचा ही व्हिडीओ आहे. यामुळे पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गाडीवर उभं राहून मद्यप्राशन करत गुन्हेगारांचे मध्यरात्री भररस्त्यात नृत्य

गारखेडा परिसरातील कुख्यात गुन्हेगार शेख जावेद ऊर्फ टिप्या शेख मकसूद (रा. विशालनगर) याच्यावर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गतवर्षी एका खून प्रकरणात त्याचा समावेश होता. पुंडलिकनगर पोलिसांनी त्याला अटक करत पिस्तुल व जिवंत काडतुसे हस्तगत केली होती. याशिवाय विनयभंगाचे देखील गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्यामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या काळात ९ ऑक्टोबर २०१९ रोजी स्थानबद्धतेची कारवाई करत त्याची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली होती. ३० सप्टेंबर रोजी तो हर्सुल कारागृहातून बाहेर पडला. त्यादिवशी देखील त्याच्या स्वागतासाठी अनेक गुन्हेगारांनी हर्सुल कारागृहाबाहेर गर्दी केली होती. या गुन्हेगारांनी त्याच्यासोबत कारागृहाबाहेरच फोटोसेशन करत व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केले होते.

कारागृहातून सुटका होताच टिप्याने पुन्हा धुडगूस घालायला सुरुवात केली आहे. अशातील त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामधे मध्यरात्री भररस्त्यात तरुणीसोबत तो कारवर डान्स करत सिगारेट आणि बियर पिताना दिसत आहे. यावर मात्र पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. सर्व सामान्यांना खाकीचा धाक दाखवणारे पोलीस भररस्त्यावर धुडगूस घालणाऱ्या या गुन्हेगारावर कारवाई करणार कधी, हा प्रश्न आहे.

हेही वाचा -शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योगाकडे वळावे- आमदार उदयसिंग राजपूत

ABOUT THE AUTHOR

...view details