महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सैराट' जोडप्यासह नातलगांना मुलीच्या कुटुंबीयाकडून मारहाण; वैजापूर तालुक्यातील घटना - मारहाण

प्रेमविवाह केल्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी मुलासह त्याच्या नातेवाईकांना मारहाण केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे घडली.

नवविवाहित जोडपे

By

Published : May 26, 2019, 3:23 PM IST

औरंगाबाद - तरुण-तरुणीने प्रेमविवाह केल्यामुळे मुलीच्या नातलगांनी आज सकाळी मुलाच्या घरी जाऊन त्याच्यासह नातेवाईकांना बेदम मारहाण केली. वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे ही घटना घडली.

घाटी रुग्णालय

वैजापूर तालुक्यातील साकेगाव येथील तरुणीची आणि नालेगाव येथील तरुणाची शिरूर येथील महाविद्यालयात ओळख झाली. हळूहळू ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. या तरुण आणि तरुणींने लग्न करायचे ठरवले. याबाबत दोघांनीही घरच्या मंडळींना माहिती दिली होती. मात्र, तरुणीच्या घरच्यांनी याला स्पष्ट नकार दिला. तरुणाच्या घरच्यांनी मात्र हा विषय तरुणावर सोपवला. या दोघांनीही १८ एप्रिलला पळून जाऊन न्यायालयात रितसर लग्न केले.

लग्न केल्यानंतर एप्रिलपासूनच हे जोडपे फरार होते. अखेर २ दिवसांपूर्वी हे दोघेही तरुणाच्या घरी दाखल झाले. ही माहिती तरुणीच्या घरी समजली. त्यांनी थेट नालेगाव येथे जाऊन तरुणाच्या घरी राडा केला. यात या जोडप्यासह मुलाकडील ४ ते ५ नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे नालेगाव येथे तणावाचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती शिरूर पोलीस ठाण्याला कळतात पोलिसांनी नालेगाव येथे धाव घेतली. त्यांनी मुलीकडील नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मारहाणीत जखमी झालेल्यांना औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details