औरंगाबाद -कन्नड शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून गुरुवारी नगरसेविका आणि आरोग्य सभापती विद्या काशीनंद यांनाच कुत्र्याने चावा घेतला आहे. गुरुवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नगरसेविका आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना घरासमोरच पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांना लक्ष्य केले. यात त्यांच्या पायाला इजा झाली आहे.
हेही वाचा - भारत आणि 'उगवत्या सूर्याचा देश'...
विशेष म्हणजे विद्या काशीनंद यांनी यापूर्वीच नगरपरिषदेच्या सभेमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, असे आदेश दिले होते. कुत्र्यांमुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली असून यापूर्वी काही शाळकरी मुलांना कुत्र्याने चावा घेतला आहे. यामुळे नगरसेविका यांनी तत्काळ कुत्र्यांवर आवर घालावा यासंबंधीचे निवेदन मुख्याधिकरी यांना दिलेले होते. विद्या काशीनंद या स्वतः शिक्षण व आरोग्य सभापती असल्याने त्यांनी याबाबत वेळोवेळी मुख्याधिकाऱ्यांना लेखी व तोंडी सूचना दिल्या मात्र त्याकडे मुख्याधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. कन्नड येथे औरंगाबाद येथील पकडलेली कुत्री रात्री बेरात्री आणून सोडली जात असल्याचा नागरिकांनी केला आहे.