औरंगाबाद - महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एका माजी नगरसेवकाने चक्क आपला वॉर्ड हरवल्याची ओरड केली आहे. इतकच नाही, तर माझा वॉर्ड शोधून द्या, असे म्हणत या नगरसेवकाने पोलिसांत धाव घेत आपली तक्रार नोंदवली आहे.
औरंगाबादेत वॉर्ड हरवला, नगरसेवकाची पोलिसात तक्रार
औरंगाबादेतील नवीन वॉर्ड रचनेत ब्रिजवाडी वॉर्ड विभागला गेला आहे. त्यामुळे त्या वॉर्डचे अस्तित्व नाहीसे झाले आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले माजी नगरसेवक भगवान रगडे यांनी एमआयडीसी सिडको पोलिसात वॉर्ड हरवल्याची अजब तक्रार दिली आहे.
नवीन वार्ड रचनेत ब्रिजवाडी वॉर्ड विभागला गेला आहे. त्यामुळे त्या वॉर्डचे अस्तित्व नाहीसे झाले आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले माजी नगरसेवक भगवान रगडे यांनी एमआयडीसी सिडको पोलिसात वॉर्ड हरवल्याची अजब तक्रार दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीची आरक्षण सोडत पार पडली. या सोडतीत अनेक दिग्गजांना धक्का बसला. त्यातच वॉर्ड रचना बदलल्याने अनेकांच्या इच्छेवर विरजण पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात अनेक इच्छुकांनी बदललेल्या वॉर्ड रचनेवर आक्षेप नोंदवला आहे. त्यातच ब्रिजवाडी हा वॉर्ड 20, 21 आणि 22 अशा वॉर्डमध्ये विभागला गेला आहे. त्यामुळे ब्रिजवाडी वॉर्डचे अस्तित्व नाहीसे झाले. त्यामुळे या वॉर्डामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. त्यातच याच वॉर्डमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या भगवान रगडे या माजी नगरसेवकाने थेट पोलीस ठाणे गाठून आपला वॉर्ड हरवल्याची तक्रार दिली आहे. वॉर्डमधील काही नागरिकांना सोबत घेत आपल्या भागातील समस्या सोडविण्यासाठी जुनीच वॉर्ड रचना ठेवा, अशी मागणी देखील केली आहे.