औरंगाबाद -जूनपासून सरकार दररोज पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करत आहे. ही इंधन दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी तालुका व शहर कॉंग्रेसच्यावतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन जिल्हाध्यक्ष माजी आमदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढी विरोधात काँग्रेसचे पैठणमध्ये आंदोलन - पेट्रोल-डिझेल दरवाढ
पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. ही इंधन दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी पैठण तालुका व शहर कॉंग्रेसच्यावतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
एकीकडे देश कोरोनासारख्या गंभीर संकटाचा सामना करत असताना केंद्राने पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करून सामान्य जनतेची लूट सुरू केली आहे. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. उद्योग-व्यवसाय अद्याप पूर्वपदावर नाही. त्यात इंधन दरवाढ ही सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. काही राज्यात पेट्रोलपेक्षा डिझेल दर जास्त झाला आहे. ही दरवाढ सुरूच राहिली तर पेट्रोल व डिझेल 100 रूपये होईल. केंद्र सरकारने उत्पादन शुल्क वाढवले आहे. त्यामुळे इंधन दरवाढ करून सुरू असलेली नफेखोरी बंद करून इंधन दरवाढ मागे घ्यावी. मोदी सरकारने सामान्य जनतेस वेठीस धरण्याचा प्रकार थांबवावा यासाठी आज कॉंग्रेसच्यावतीने पैठण येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री अनिल पटेल, कॉग्रेस प्रदेश सचिव रविंद्र काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष मिनाताई शेळके, जिल्हा परिषद सदस्य पल्लवीताई नवथर, संचालक भाऊसाहेब औटे
आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.