महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जलील-खैरेंमध्ये मुख्यमंत्र्यांसमोरच रंगले खुर्ची नाट्य - माजी खासदारात चंद्रकांत खैरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला केवळ लोकप्रतिनिधी आमंत्रित असताना शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे या बैठकीला गेले. त्यानंतर जलील बसणार त्या खुर्चीवर जाऊन बसले. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बाजूला राजशिष्टाचारानुसार खासदार इम्तियाज जलील यांची खुर्ची होती. ही बाब शिवसेना नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जलील यांना पुढे बसण्यास सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोरच हा सर्व प्रकार घडला.

abad
जलील-खैरेंमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर रंगले खुर्ची नाट्य

By

Published : Jan 9, 2020, 11:30 PM IST

औरंगाबाद -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी(9 जानेवारी) विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील कामांची आढावा बैठक पार पडली. यावेळी आजी-माजी खासदारांमध्ये खुर्चीवरुन नाट्यमय प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले. बैठकीत मंत्री, खासदार, आमदार, अधिकारी यांच्या जागेवर खुर्चीसमोर त्यांची नेमप्लेट लावण्यात आली होती. मात्र, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या खुर्चीवरच ठाण मांडले. त्यामुळे इम्तियाज जलील यांना शेजारच्या खुर्चीवर बसावे लागले. बैठकीत रंगलेला हा खुर्चीचा किस्सा आता चर्चेचा विषय ठरत आहे.

जलील-खैरेंमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर रंगले खुर्ची नाट्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला केवळ लोकप्रतिनिधी आमंत्रित असताना शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे या बैठकीला गेले. त्यानंतर जलील बसणार त्या खुर्चीवर जाऊन बसले. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बाजूला राजशिष्टाचारानुसार खासदार इम्तियाज जलील यांची खुर्ची होती. ही बाब शिवसेना नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जलील यांना पुढे बसण्यास सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोरच हा सर्व प्रकार घडला.

हेही वाचा -'शेतकऱ्यांना कर्जमुक्ती बरोबरच चिंतामुक्तही करणार'

बैठकीनंतर चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना काहीच झाले नाही, असे सांगत काढता पाय घेतला. खासदार जलील यांनी मात्र खुर्चीवरून नाट्य रंगल्याची कबुली दिली. माजी खासदारांना अजून खुर्ची सुटत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. नंतर मात्र, मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात येऊन आढावा घेतला, ही गोष्टी जास्त महत्वाची असल्याचे सांगत आपण खुर्चीचा मुद्दा दुर्लक्षित केला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details