छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)Chief Justice Dhananjay Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश (CJI) धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी मोठं विधान केलंय. विधी व्यवसायाचे भवितव्य या व्यवसायात गुंतलेल्या नागरिकांच्या सचोटीवर अवलंबून असल्याचं चंद्रचूड म्हणाले. अखंडता हा कायदेशीर व्यवसायाचा गाभा आहे, त्याची समृद्धी किंवा नाश त्याच्याशी संबंधित लोकांच्या वर्तनावर अवलंबून असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं आयोजित केलेल्या ''कायदेशीर व्यवस्था बळकट करण्यासाठी न्यायाधीश आणि वकील यांच्यातील सहकार्य कसे वाढवायचंं'' या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
36 हजार निकालपत्रे ऑनलाईन : सुरुवातीलाच चंद्रचूड यांनी मराठवाड्यातील संत परंपरेचा मराठीतून उल्लेख करून निजामाविरुद्धच्या लढाईतील स्वातंत्र्यसैनिकांचा उल्लेख केलाय. त्यांच्या बलिदान निष्ठेचं फळ आपण स्वातंत्र्याच्या रूपाने चाखत आहोत, त्यामुळं त्याची जाणीव ठेवण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा अवलंब ही काळाची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सुमारे 36 हजार निकालपत्रे वकिल, न्यायाधीशांच्या फायद्यासाठी ESER प्रणालीवर मराठीसह विविध भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अशी देखील त्यांनी माहिती दिली.
प्रामाणिकपणा हा कायदेशीर व्यवसायाचा गाभा :आपण सर्वजण आपल्या विवेकानं झोपतो. तुम्ही संपूर्ण जगाला मूर्ख बनवू शकता, परंतु तुम्ही तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीला मूर्ख बनवू शकत नाही. तो रोज रात्री प्रश्न विचारत राहतो. प्रामाणिकपणा हा कायदेशीर व्यवसायाचा गाभा आहे. सचोटीनं आपण एकतर जगू किंवा स्वतःचा नष्ट होऊ. वकिलांना सन्मान मिळतो, जेव्हा ते न्यायाधीशांचा आदर करतात. न्यायाधीश जेव्हा वकिलांचा आदर करतात, तेव्हा त्यांना सन्मान मिळतो. दोन्ही न्यायाचा भाग असल्याची जाणीव झाल्यावर परस्पर आदर निर्माण होतो, असं चंद्रचुड यांनी म्हटलंय.
समान संधी विधी व्यवसायासमोरील आव्हान :भारतीय विधी व्यवसायासमोरील एक महत्त्वाचे आव्हान, या व्यवसायाला समान संधी देणारा व्यवसाय बनवणं आहे, असं मला वाटतं. कारण आजच्या कायदेशीर व्यवसायाची रचना आजपासून 30 किंवा 40 वर्षांनी त्याची व्याख्या करेल. जेव्हा मला विचारलं जातं की, आपल्याकडं पुरेशा महिला न्यायाधीश का नाहीत, तेव्हा मी त्यांना सांगतो, आज कॉलेजियमकडे पाहू नका. कारण त्याला बारमध्ये उपलब्ध असलेल्या टॅलेंटमधून निवड करावी लागते. 20-30 वर्षांपूर्वीची आपल्या समाजाची स्थिती पाहावी लागेल. आज उच्च न्यायव्यवस्थेत दाखल होणारे न्यायाधीश 20-25 वर्षांपासून बारचे सदस्य आहेत.
- महिलांना कायदेशीर व्यवस्थेत योग्य स्थान :कायदेशीर व्यवसायातील प्रमुख भागधारक या नात्यानं, महिलांना कायदेशीर व्यवस्थेत योग्य स्थान दिलं जाईल याची खात्री करणं हे न्यायाधीश, वकिलांचं काम आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वकिलांनी तंत्रज्ञानाचा अवलंब करून काळाशी सुसंगत राहण्याचं आवाहनही चंद्रचुड यांनी यावेळी केलंय.
हेही वाचा -
- CJI News : सरन्यायाधीशांनी वकीलाला सुनावलं?, वाचा सविस्तर
- Supreme Court Hearing On Shiv Sena : शिवसेनेचं चिन्ह, पक्षाबाबत सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी
- SC Hearing on Shivsena : शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष कोणाचा? सुनावणी दोन मिनिटात होऊ शकत नाही - सर्वोच्च न्यायालय