औरंगाबाद - फुसके विषय काढायचे आणि गोंधळ घालायचा ही एमआयएमची प्रथा आहे. सर्व खासदारांचे महानगरपालिकेने अभिनंदन केले आहे. त्यामुळे जलील यांचे विशेष अभिनंदन करण्याची गरज नाही, असे मत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकात खैरे यांनी मांडले. एमआयएमचे नगरसेवक जसे महापालिकेत निवडून आले तसे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वाढला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
एमआयएमच्या नगरसेवकांमुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वाढला - चंद्रकात खैरे - shivsena
फुसके विषय काढायचे आणि गोंधळ घालायचा ही एमआयएमची प्रथा आहे. सर्व खासदारांचे महानगरपालिकेने अभिनंदन केले आहे. त्यामुळे जलील यांचे विशेष अभिनंदन करण्याची गरज नाही, असे मत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकात खैरे यांनी मांडले.
एमआयएमचे नगरसेवक पालिकेचे कामकाज सुरळीत चालु देत नाहीत. कुठल्याही विषयाला विरोध करतात, असा आरोप खैरे यांनी केला. एमआयएमला विकासाचे काहीही पडले नसून ते विकास कामांमध्ये अडथळे आणतात. त्यांची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असे खैरे म्हणाले.
सर्वसाधारण सभेत महापौरांनी चांगली भूमिका घेतली. महापौरांना अधिकार आहेत, त्यानुसार नगरसेवकांना बाहेर काढले. त्यात काही चूक नाही, अशी महापौरांची पाठराखण चंद्रकात खैरे यांनी केली. नवनिर्वाचित खासदार ईम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव पालिकेत एमआयएमच्या नगरसेवकांनी मांडला होता. तो मान्य न झाल्याने २५ नगरसेवकांनी गोंधळ घातला. गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना निलंबीत करण्यात आले आहे.