औरंगाबाद : पीकविमा कंपनी धोरण आणि शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता शिवसेना उध्दव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. गंगापूर रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात ( Chakka jam protest in Aurangabad ) आले. रस्त्यावर चारा जाळून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व विरोधपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केले. रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी कारवाई करत अंबादास दानवे यांना कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले (Ambadas Danve detained by police ).
Chakka Jam Protest : औरंगाबादमध्ये चक्का जाम आंदोलन, शेतकरी आक्रमक - Chakka jam protest in Aurangabad
पीकविमा कंपनी धोरण आणि शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता शिवसेना उध्दव ठाकरे गट आक्रमक. गंगापूर रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर चारा जाळून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी कारवाई करत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले आहे.
विमा कंपन्या देत नाहीत मदत :शेतकऱ्यांनी काढलेला पिक विमा त्यांना मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. सरकारने एक हजारांपेक्षा कमी मदत कोणत्याही शेतकऱ्याला मिळणार नाही असे सांगितले होते. मात्र शेतकऱ्यांना पाच रुपये, दहा रुपये, पन्नास रुपये अशा पद्धतीने पिक विम्याची रक्कम खात्यात जमा होत आहे. हा शेतकऱ्यांचा अवमान असून त्या विरोधातच शिवसेना आक्रमकपणे आपली बाजू मांडणार आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना सरकारला स्वस्त बसू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.
वीज मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत : शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळेल अस आश्वासन सरकारकडून नेहमीच दिला जात. मात्र प्रत्यक्षात विजेसाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. अपूरी वीज असल्याने शेतीला पाणी देणे होत नाही. पिकांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळेच शिवसेना आक्रमक रित्या आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांना पूर्ण वेळ मोफत वीज देऊ असे कृषिमंत्री सांगतात. मात्र त्यांच्या हातात हा निर्णय नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांनी किंवा वीज मंत्र्यांनी बोलावे त्यालाच अर्थ असेल असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्याशी बातचीत केली आमचे औरंगाबाद प्रतिनिधी यांनी.