औरंगाबाद : उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यास मान्यता असून औरंगाबादचे नाव मात्र संभाजीनगर करण्याबाबत प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मत केंद्राने मुंबई उच्च न्यायालयात सादर केला त्यामुळे औरंगाबाद नामांतर रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इतकेच नाही तर नामांतर करण्याआधी त्या त्या जिल्ह्यातून हरकती मागविण्यात आल्या का याबाबत सरकारला 27 तारखेला आपली म्हणणे मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आले.
नामांतराचा वाद न्यायालयात :महाविकास आघाडी सरकार त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर, 'उस्मानाबाद'चे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यावेळेस फक्त दोन मंत्री उपस्थित होते, असे असले तरी उस्मानाबाद जिल्ह्याला शासकीय पातळीवर धाराशिव म्हणले जाऊ लागले. तर औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी देखील शहराचे नाव संभाजीनगर म्हणून उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणीच्या वेळी उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यास मान्यता मिळाली असून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास मात्र, अद्याप प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.