औरंगाबाद- हॉटेल बंद करण्यासाठी टीव्हीचा आवाज कमी करून जेवणाचे बिल द्या, असे कॅशियरने सांगितल्याने ८ जणांनी वाद घालून त्याच्यावर हल्ला केला. ही घटना चिस्तीया कॉलनी येथे घडली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
व्हिडिओ : औरंगाबादेत जेवणाचे बिल मागितल्याने ग्राहकांची हॉटेल चालकाला मारहाण - fought
औरंगाबादेत जेवणाचे बिल मागितल्याने ८ जणांनी हॉटेल चालकाला मारहाण मारहाण केली. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे.
कैलास प्रकाश सुलाने, असे संशयिताचे नाव आहे. चिस्तीया चौकात फिजा हॉटेलमध्ये रात्री अकराच्या सुमारास ८ जण हॉटेलमध्ये आले दारू व जेवण करताना त्यांनी टीव्हीचा आवाज वाढवला. त्यामुळे कॅशिअर गणेश शेवाळे यांनी त्यांना टीव्हीचा आवाज कमी करा जेवणाचे बिल लगेच द्या, हॉटेल बंद करण्याची वेळ झाल्याचे सांगितले. यावरून ८ जणांनी शेवाळे यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील एकाने टेबलवरील काचेचा ग्लास शेवाळे यांच्या डोळ्याजवल व त्यांच्या हातावर मारला. हॉटेलमधील गोंधळ पाहून मालक प्रवीण जयस्वाल व व्यवस्थापक रंजीत राजपूत यांनी धाव घेतली. यानंतर सिडको पोलिसांना कळवले. यात संशयित कैलास सुलाने याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित ७ जण पसार झाले आहे. या घटनेची नोंद सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली पोलीस असून पुढील तपास करत आहेत.