महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत कवी किशोर कदम यांचे कविता वाचन; काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा

कलाकार म्हणून आपला वेगळा ठसा उमठावणारे किशोर कदम म्हणजेच कवी सौमित्र यांच्या कवितांची अनोखी मेजवानी औरंगाबादकरांनी यावेळी अनुभवली. एमजीएमच्या रुख्मिनी सभागृहात किशोर कदम यांनी आपल्या कवितांचे वाचन केले. त्यांच्या कविता त्यांच्याच आवाजात ऐकण्याची संधी साहित्यीक आणि श्रोत्यांनी अनुभवली, तसेच तीला भरभरुन प्रतिसाद दिला.

काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा

By

Published : Aug 4, 2019, 9:31 AM IST

औरंगाबाद -कवी, नाटककार आणि कलाकार किशोर कदम यांच्या बाउल या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि कविता वाचनाचा कार्यक्रम औरंगाबादेत पार पडला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद, पॉप्युलर प्रकाशन व महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

औरंगाबादेत कवी किशोर कदम यांचे कविता वाचन आणि काव्यसंग्रहाचे प्रकाशन

कलाकार म्हणून आपला वेगळा ठसा उमठावणारे किशोर कदम म्हणजेच कवी सौमित्र यांच्या कवितांची अनोखी मेजवानी औरंगाबादकरांनी यावेळी अनुभवली. एमजीएमच्या रुख्मिनी सभागृहात किशोर कदम यांनी आपल्या कवितांचे वाचन केले. त्यांच्या कविता त्यांच्याच आवाजात ऐकण्याची संधी साहित्यीक आणि श्रोत्यांनी अनुभवली, तसेच तीला भरभरुन प्रतिसाद दिला.

बाउल हा कविता संग्रह पूर्ण करण्यासाठी 17 वर्ष लागले. या आधीचे कविता संग्रह रोमँटिक होते त्या पेक्षा वेगळे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. हा कविता संग्रह सर्वसामान्यांचा आहे. प्रत्येकाने अनुभवलेला असा हा कविता संग्रह आहे. असे मत कवी सौमित्र यांनी यावेळी व्यक्त केले. या कविता संग्रहाचे वाचन कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम यांनी आपल्या शैलीत सादर केले. त्यांचे सादरीकरण पाहून श्रोते वेगळ्याच विश्वात रमले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details