सिल्लोड (औरंगाबाद) - ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत तालुक्यातील भवन, घटांब्री, अनाड येथील भाजपाचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शहरातील सेना भवन येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी नेते अब्दुल समीर, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, पंचायत समितीच्या सभापती डॉ. कल्पना जामकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, डॉ.संजय जामकर, नॅशनल सूत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील भाजपा सरपंच, उपसरपंचासह सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश
तालुक्यातील भवन, घटांब्री, अनाड येथील भाजपाचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शहरातील सेना भवन येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये भवन येथील सरपंच संजीवनी माधवराव कळम, उपसरपंच सुलोचना पोपटराव खाजेकर, ग्रा.पं. सदस्य मुकेश मतलाल परदेशी, दिलीप भानुदास कळम, रविंद्र साहेबराव कदम, सुनील सुखदेव लांडगे, काकाजी येडुबा शेजुळ, माधवराव कळम, माणिक येडुबा शेजुळ, विजय पोपटराव खाजेकर, सुदाम बाबुराव थोरात, घटांब्री येथील सरपंच संतोष पुंडलिक पंडित, उपसरपंच प्रेमराज सांडू करधे, ग्रा.पं. सदस्य विलास रामसिंग करधे, किशोर कडूबा मोकासरे, शालीक राजाराम घुगरे, रामराव खंडू तायडे, कौतीक गोविंदा घुगरे, शामराव देवराव सपकाळ, गजानन विष्णू घुगरे, गजानन कौतिक पवार, समाधान निळूबा शिंदे, माधवराव नागवे, तर अनाड बरडवस्ती येथील ग्रा.प. सदस्य संदीप दादाराव मानकर, बाबासाहेब सोनाजी गोंडे, गजानन देवराव गदाई, विष्णू बाबुराव मुके, रामदास चिमाजी यदमक आदींचा समावेश आहे.
हेही वाचा -"एकच छंद, गोपीचंद" घोषणा देत पडळकर समर्थकांची सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक