महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप आमदार सुरेश धसांचे बेताल वक्तव्य, भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांना विरप्पनची उपमा - bjp

पाकिस्तानच्या तावडीतून परतलेले भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे कौतुक करताना सुरेश धस यांनी अभिनंदन यांना थेट विरप्पनची उपमा दिली. विरप्पनसारखा अभिनंदन परतला, हे मोदींच्या धोरणाचे आणि खंबीर नेतृत्त्वाचे लक्षण असल्याचे वादग्रस्त वक्तव्य धस यांनी केले.

भाजप आमदार सुरेश धसांचे बेताल वक्तव्य

By

Published : Apr 11, 2019, 11:45 AM IST

औरंगाबाद - भाजप आमदार सुरेश धस यांनी बेताल वक्तव्य करत पातळी ओलांडल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानच्या तावडीतून परतलेले भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे कौतुक करताना सुरेश धस यांनी अभिनंदन यांना थेट विरप्पनची उपमा दिली. विरप्पनसारखा अभिनंदन परतला, हे मोदींच्या धोरणाचे आणि खंबीर नेतृत्त्वाचे लक्षण असल्याचे वादग्रस्त वक्तव्य धस यांनी केले.

भाजप आमदार सुरेश धसांचे बेताल वक्तव्य

औरंगाबादमध्ये आयोजित प्रचारसभेत सुरेश धस बोलत होते. विरप्पनसारखा अभिनंदन परतला, हे मोदींच्या धोरणाचे आणि खंबीर नेतृत्त्वाचे लक्षण असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी औरंगाबादमध्ये केले. त्यानंतर आपण विरप्पन आणि अभिनंदन यांची तुलना करत नसल्याचे सांगत धस यांनी सारवासारव केली. सर्जिकल स्ट्राईकही 20 मिनिटात झाले असल्याचे धस म्हणाले.

अमेरीकेने लादेनला काही क्षणात उचलून समुद्रात टाकला होते, असे म्हणत सुरेश धस यांनी सर्जिकल स्ट्राईकचे महत्व पटवून दिले. यापुढे सर्जिकल स्ट्राईक करत असताना काँग्रेसच्या दोन नेत्यांना सोबत पाठवून देऊ म्हणजे ते बाँब टाकताना शूटिंग करतील. 'ते जर तिथे अडकले तर आणू की परत. विरप्पन सारखा दिसणारा अभिनंदन आणला ना 60 तासात' असे धस म्हणाले. काँग्रेसच्या लोकांना तिथे नाही सोडायचे, परत आणायचे भाषण करायला असेही सुरेश धस म्हणाले. अभिनंदनची विरप्पनशी तुलना केल्यानंतर धस यांना आपली चूक लक्षात आली. अभिनंदनची तुलना विरप्पनसोबत करणार नाही असेही धस म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details