औरंगाबाद - निवडणूक आली की, अनेक नेते सर्वसामान्यांमध्ये प्रचार करण्यासाठी जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. भाजप नेते शहानवाज हे लोकसभा उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारसभेसाठी औरंगाबाद येथे आले होते. येथे ते मुस्लिम मतदारांनाही भेटले. त्यांच्यासोबत फालुद्याचा आस्वादही घेतला.
औरंगाबाद : भाजप नेत्याने घेतली मुस्लिम मतदारांची भेट - aurangabad
भाजप नेते शहानवाज हे लोकसभा उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारसभेसाठी औरंगाबाद येथे आले होते. येथे ते मुस्लिम मतदारांनाही भेटले. त्यांच्यासोबत फालुद्याचा आस्वादही घेतला.
प्रचार सभा संपल्यावर शहानवाज हुसेन यांनी आजारी असलेल्या रावसाहेब दानवे यांची रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांनी स्थानिक नेत्याची गाडी आणि कार्यकर्ते घेऊन थेट शहागंज गाठले. शहागंज येथील एका दुकानात फालुद्याचा अस्वाद घेत मुस्लिम मतदारांशी संवाद साधला. एवढेच नाही, तर स्वतःहून मुस्लिम मतदारांसोबत सेल्फी काढत प्रचार केला.
एरवी थंडगार एसी सुरु करून आपल्या आलिशान गाडीत फिरणारे नेते निवडणूक सुरु झाली, की कसे सर्वसामान्य होतात, हे पुन्हा एकदा दिसून आले.