महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार रोहित पवारांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस ; राम शिंदेंनी दाखल केली होती याचिका - minister ram shinde

रोहित पवारांनी प्रचारादरम्यान गैरप्रकार केला असल्याचा आरोप करत राम शिंदे यांनी याचिका दाखल केली होती. मतदारांना लाच देणे, राम शिंदे यांची बदनामी करणे, निवडणूक खर्चाचे तपशील लपवणे आदी मार्गांचा आधार घेऊन निवडणुकीत विजय मिळवला असल्याचा आक्षेप राम शिंदे यांनी घेतला.

रोहित पवार राम शिंदे
रोहित पवार राम शिंदे

By

Published : Feb 12, 2020, 1:24 AM IST

Updated : Feb 12, 2020, 5:51 AM IST

औरंगाबाद -आमदार रोहित पवार यांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस पाठवली आहे. माजी मंत्री राम शिंदे यांनी केलेल्या निवडणूक याचिकेवर आमदार रोहित पवार यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

निवडणूक लढताना गैरप्रकार केला असल्याचा आरोप करत माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात इलेक्शन पिटीशन दाखल केली. त्यावरून मंगळवारी औरंगाबाद खंडपीठाने रोहित पवार यांना नोटीस बजावली आहे.

हेही वाचा...'दिल्लीकरांनी भाजपच्या अहंकाराचा पराभव केला, पराभवाची मालिका आता थांबणार नाही'

रोहित पवारांनी मतदारांना लाच देणे, राम शिंदे यांची बदनामी करणे निवडणूक खर्चाचे तपशील लपवणे आणि या सर्वांचा आधार घेऊन निवडणुकीत विजय मिळवला, असा आक्षेप शिंदे यांनी घेतला आहे. त्याचबरोबर बारामती ऍग्रो लिमिटेडचे कर्मचारी यांना प्रचारासाठी जामखेड कर्जत मतदारसंघात आणले होते. हे कर्मचारी घरोघरी जाऊन मतदारांना प्रभावित करत होते आणि एक हजार रुपयाची लाच देत होते, असाही आरोप राम शिंदे यांनी केला आहे. त्यासोबतच रोहित पवार यांनी निवडणूक खर्च दडपून ठेवला, असाही आरोप करण्यात आला आहे. यावरून औरंगाबाद खंडपीठाने रोहित पवार यांना नोटीस पाठवली आहे. पुढील सुनावणी 13 मार्च रोजी आहे.

Last Updated : Feb 12, 2020, 5:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details