महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंधरा मिनिटात चोरली दुचाकी; अन चोवीस तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या - theft

पोलिसांनी जालना जिल्ह्यातील रुई गावातून आरोपीला अटक केली. या आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.

नंदू भीमराव सोनवणे

By

Published : May 4, 2019, 2:37 PM IST

औरंगाबाद - गजानन नगर येथे चोरीला गेलेली दुचाकी २४ तासात हस्तगत करुन पोलिसांनी चोरास बेड्या ठोकल्या. महादेव परमेश्वर धाईत (रा. रुई, ता. अंबड जिल्हा. जालना ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे

गजानन नगर भागात 30 एप्रिलला नंदू भीमराव सोनवणे यांनी त्यांची दुचाकी एका दुकानासमोर लावली होती. त्यानंतर १५ मिनीटाच्या आत आरोपीने त्यांची दुचाकी चोरली. नंदू सोनवणे यांनी दुचाकी चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी २४ तासांच्या आत जालना जिल्ह्यातील रुई गावातून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेली दुचाकी हस्तगत केली.

या आरोपीकडून शहरातील आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details