औरंगाबाद :नेवरगाव वाहेगाव रस्त्यावर टिप्पर व दुचाकीच्या अपघातात एक जन जागीच ठार ( One person died on spot in accident ) झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजेदरम्यान घडली आहे. किरण रंगनाथ अल्हाट राहणार महालगाव असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. टिप्पर दुचाकीच्या समोरासमोर धडकेत ( Headon collision with tipper bike) हा अपघात घडला आहे.
Accident : अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; टिप्पर व दुचाकीची समोरासमोर धडक - अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
नेवरगाव वाहेगाव रस्त्यावर टिप्पर व दुचाकीच्या अपघातात एक जन जागीच ठार ( One person died on spot in accident ) झाल्याची घटना घडली आहे.
मृतदेह बराच वेळ रस्त्यावर पडून:सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान टिप्पर व दुचाकीच्या घडलेल्या अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू झाला होता. अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी स्वराचा मृतदेह बराच वेळ वाहेगाव नेवरगाव रस्त्यावरील घटनास्थळी पडून होता. साडेपाच वाजेच्या सुमारास मृतदेह गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
अपघातात दुचाकी स्वराचा जागेवरच मृत्यू :वाहेगाव येथून नेवरगावकडे रस्त्यावर रस्त्याच्या कामासाठी खडी वाहतूक करणारे टिप्पर एम. एच. २०.ए टी.8495 व नेवरगाव येथून वाहेगाव मार्गे महालगाव कडे जाणाऱ्या विनाक्रमांकाच्या दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील किरण आल्हाट यांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला आहे. अपघात होऊन बऱ्याच वेळानंतर मृतदेह रुग्णवाहिकेने उपजिल्हा रूग्नालय गंगापूर येथे आणण्यात आला. घटनेची गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.