आई त्याचेच लाड का करते? औरंगाबादमध्ये सख्या भावाचा खून - Aurangabad
मोठ्या भावाला सर्वजण चांगले म्हणतात, आई देखील त्याचेच कौतुक करते, अशी द्वेष भावना मनात घर करून बसलेल्या लहान भावाने जुळ्या १६ वर्षीय मोठ्या भावाच्या डोक्यात हतोड्याने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
औरंगाबाद- मोठ्या भावाला सर्वजण चांगले म्हणतात, आई देखील त्याचेच कौतुक करते, अशी द्वेष भावना मनात घर करून बसलेल्या लहान भावाने जुळ्या १६ वर्षीय मोठ्या भावाच्या डोक्यात हतोड्याने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कैलासनगर भागात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन भावाला ताब्यात घेतले आहे.
अजय- विजय(वय १६, रा. कैलासनागर, औरंगाबाद, अल्पवयीन असल्याने नाव बदललेले), अशी दोन्ही जुळ्या भावांची नावे आहेत. दोन्ही भाऊ काही मिनिटांचे लहान-मोठे होते. अजय हा सर्व कामात अग्रेसर असल्याने त्याचे सर्वचजण कौतुक करायचे. ही गोष्ट विजयला नेहमीच खटकत होती.
त्यामुळे मंगळवारी संध्याकाळी अजय झोपलेला असताना त्याचा सख्खा जुळा भाऊ विजयने त्याच्या डोक्यात हतोड्याने ५ वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर घराला बाहेरून कडी लावून तो निघून गेला. काही वेळाने घरी येऊन त्याने अजय रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचा कांगावा केला. मात्र, पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने घटनेची कबुली दिली.