महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhausaheb Thombare : पक्षाने सांगितल्यास पंकजही विधानसभा लढवू शकतो ; भाऊसाहेब ठोंबरे

कॉंग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष व नुकतेच राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केलेले भाऊसाहेब ठोंबरे व पुतने प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष पंकज ठोंबरे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली (Thombare organized press conference in Vaijapur) होती.त्यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार भाऊसाहेब चिगटगावकर यांना अगदी नरम भाषेत उत्तर दिले.

Bhausaheb Thombre and Pankaj Thombre
भाऊसाहेब ठोंबरे व पंकज ठोंबरे

By

Published : Nov 19, 2022, 12:47 PM IST

औरंगाबाद :राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थित 16 नोव्हेंबरला बुधवारी 12 वाजेच्या सुमारास युवक कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष पंकज ठोंबरे यांचा पक्ष प्रवेश पार (Bhausaheb Thombre and Pankaj Thombre) पडला.

प्रतिक्रिया देताना भाऊसाहेब ठोंबरे व पंकज ठोंबरे

ठोंबरेंचे नरम भाषेत उत्तर :मात्र औरंगाबादच्या वैजापूर तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब चिगटगावकर यांचा या पक्ष प्रवेशाला विरोध कायम आहे. त्यामुळे त्यांनी औरंगाबादच्या वैजापूर येथे दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी भाऊसाहेब चिगटगांवकर यांनी ठोंबरे कुटुंबावर जोरदार टीका केली होती. हे लोक कामापुरता पक्षाचा वापर करतात. यांच्यामुळे पक्ष वाढणार नाही, याची खात्री मला आहे असे चिगटगावकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्याच अनुषंगाने कॉंग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष व नुकतेच राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केलेले भाऊसाहेब ठोंबरे व पुतने प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष पंकज ठोंबरे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली (Thombare organized press conference in Vaijapur) होती. त्यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार भाऊसाहेब चिगटगावकर यांना अगदी नरम भाषेत उत्तर देत म्हणाले कि, आमचा कुठलाही गट नाही व अजूनही ते सोबत येऊन काम करणार असतील तर आम्ही तयार (press conference in Vaijapur) आहोत.


विकासावर काम करायचे :त्यावेळी बोलतांना भाऊसाहेब ठोंबरे (Bhausaheb Thombare) यांनी असे म्हटले माझ्या पुतण्याला राष्ट्रवादीमध्ये आण्यासाठी येथील स्थानिक कार्यकर्ते यांनी खास भूमिका बजावली आहे. आमदार सतीश चव्हाण यांची यात काहीही भूमिका नाही व चिगटगावकर यांनी केलेले आरोप किती खरे किती खोटे आहे हे तुम्हाला माहीतच आहे. त्यावर मी जास्त बोलणार नाही. व आम्हाला सर्वांना सोबत राहून विकासावर काम करायचे आहे. तर पंकज ठोंबरे यांनी आमदार चिगटगांवकर यांनी केलेल्या आरोपावर बोलतांना म्हणाले कि, मी त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सहकार्यमार्फत भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी माझ्याशी बोलण टाळले, हेही मी पक्षाला सांगितले. आणि अखेर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला अखेर पक्ष प्रवेश दिला, असे पंकज ठोंबरे (Pankaj Thombre) म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details