औरंगाबाद- सिल्लोड तालुक्यात ओल्या दुष्काळाचा एक बळी गेला आहे. पावसामुळे मक्याची शेती पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले. यामुळे तरूण शेतकऱ्याने पुण्यात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.
ओल्या दुष्काळाचा बळी, सिल्लोडच्या शेतकऱ्याची पुण्यात आत्महत्या
कर्ज आणि चांगले पीक पाण्यात गेल्याच्या विवंचनेतून धानोरा येथील शेतकऱ्याने पुण्यात आत्महत्या केली आहे.
पुर्णाजी रामदास काकडे (वय 35 वर्ष रा. धानोरा, ता. सिल्लोड) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी मंगळवारी रात्री आत्महत्या केली. बुधवारी धानोरा येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. काकडे यांचेवर सहकारी सोसायटीचे १२ हजार रुपयांचे कर्ज आहे. याशिवाय खासगी कर्ज व इतर देणी होती. महसूल विभागाने पंचनामा करून शासनाला अहवाल दिला आहे. कर्जामुळे तो पुणे येथे कंपनीमध्ये ते काम करत होता. अतिवृष्टीमुळे हाताशी आलेले मका पीक उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळाल्यावर त्याने पुण्यातील भाड्याच्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा, मुलगी व आई-वडील असा परिवार आहे.