महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांची आत्महत्या - घटना

वडगाव येथे किरकोळ घरघुती वादातून २१ वर्षीय विवहितेने राहत्या घरी पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली आहे. आजारी पणाला कंटाळून २८ वर्षीय चालकाने गळफास घेल्याची घटना फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावात घडली.

मृत

By

Published : Mar 19, 2019, 3:23 PM IST

औरंगाबाद - वडगाव येथे किरकोळ घरघुती वादातून २१ वर्षीय विवहितेने राहत्या घरी पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली आहे. आजारीपणाला कंटाळून २८ वर्षीय चालकाने गळफास घेल्याची घटना फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावात घडली.

सुनीता एकनाथ टेकाळे (वय २१ रा. वडगाव कोल्हाटी, वाळूज महानगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. प्रभाकर कानोबा पवार (वय २८ रा. बाबरा, ता.फुलंब्री) असे मृत चालकाचे नाव आहे. मृत विवाहिता सुनीताचे घरात किरकोळ वाद झाले होते. या वादातून रागाच्या भरात तिने घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सुनीताला एक दीड वर्षांची मुलगी आहे, अशी माहिती मृत सुनिताच्या सासऱ्यांनी दिली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

तर दुसरी घटना ही फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावात घडली. २८ वर्षीय प्रभाकर हा खासगी वाहन चालक होता. मागील वर्षभरापासून तो अशक्त असल्याच्या कारणाने आजारी होता. अनेक रुग्णालयात उपचार केल्यानंतरही तब्येतीत फरक पडत नसल्याने तो काही दिवसापासून नैराश्यात होता. वडिलांनी त्याची सकाळीच समजूत काढली होती. मात्र, वडील गावात जाताच त्याने शेतवस्तीवरील घरात दोरीच्या साह्याने आत्महत्या केली. या प्रकरणी वदोडबाजार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details