महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत वाहतूक पोलिसांची दादागिरी; घरपोच पावती मागितल्याने तरुणाची गाडी जप्त, घटना कॅमेऱ्यात कैद - argument

दंड भरा अथवा गाडी जमा करू, असा पवित्रा पोलिसांनी घेतला. त्यावर मी गाडी सोडणार नाही, असे तो तरूण म्हणाला. मात्र, त्याचे काहीही एकून न घेता पोलिसांनी त्याची दुचाकी ताब्यात घेतली. हा सर्व प्रकार या तरुणाने त्याच्या कॅमेरात कैद केला आहे.

औरंगाबाद पोलिसांची दादागिरी तरुणाने केली कॅमेऱ्यात कैद.

By

Published : May 5, 2019, 8:00 PM IST

औरंगाबाद - येथील वाहतूक पोलिसांची दादागिरी एका तरुणाने कॅमेऱ्यात कैद केली आहे. दंडाची रक्कम नसल्याने संबंधित तरुणाने ऑनलाईन घरपोच पावती मागितली. यामुळे संतापलेल्या वाहतूक पोलिसांनी मारहाण करीत या तरूणाची दुचाकी जप्त केली. हा सर्व प्रकार या तरुणाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. प्रेम रोहिदास घोडके, असे या तरूणाचे नाव आहे.

औरंगाबाद पोलिसांची दादागिरी तरुणाने केली कॅमेऱ्यात कैद.

दुचकीस्वारच वाहतूक पोलिसांचे खरे टार्गेट आहे, असे अलीकडच्या काळात दिसत आहेत. याचाच प्रत्यय आज आला. चिकलठाणा एमआयडीसी येथील रहिवासी असलेला प्रेम रोहिदास घोडके नावाचा तरुण त्याच्या MH20, EP7938 क्रमांकाच्या दुचाकीवरून कॅनॉट गार्डन परिसरातून प्रोझोन मॉलकडे जात होता. त्याने हेल्मेट घातले नसल्याने ३ वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला थांबविले. तो थांबल्यानंतर त्याला दंडाची रक्कम भरण्यासाठी सांगितली. मात्र, त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने पोलिसांना गाडीचा फोटो काढा आणि घरपोच सुविधा असलेली पावती पाठवा, अशी विनंती केली. मात्र, पोलिसांनी त्यास नकार दिला.

दंड भरा अथवा गाडी जमा करू, असा पवित्रा पोलिसांनी घेतला. त्यावर मी गाडी सोडणार नाही, असे तो तरूण म्हणाला. मात्र, त्याचे काहीही एकून न घेता पोलिसांनी त्याची दुचाकी ताब्यात घेतली. हा सर्व प्रकार या तरुणाने त्याच्या कॅमेरात कैद केला आहे. या तरूणाने पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात सिडको ठाण्यात तक्रार दिली आहे. आता या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकारी किती दखल घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details