महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकसभेच्या पार्श्वभूमिवर १०२ जणांवर तडिपारीची कारवाई होणार - तडीपार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी महिनाभरात ९०० पेक्षा अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.नागनाथ कोडे माहिती देताना

By

Published : Mar 25, 2019, 6:33 PM IST

औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी महिनाभरात ९०० पेक्षा अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर शहरातील कुख्यात गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. येत्या आठवडयात १०२ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी दिली.

सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.नागनाथ कोडे माहिती देताना


मागील वर्षभरात औरंगाबाद शहर अनेक दंगलीने गाजले. तर २० पेक्षा अधिक हत्या झाल्याच्या घटनाही शहरात घडल्या आहेत. ही बाब लक्षात घेता येत्या लोकसभा निवडणुकी दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न न उदभवता निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पाडावी, यासाठी शहर पोलीसांच्यावतीने खबरदारी घेतली जात आहे. याचा उपाय म्हणून शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे.


या यादीमध्ये कुख्यात गुंड व अवैध धंदे करणारे गुन्हेगारांचा समावेश आहे. अशा सुमारे १ हजार पेक्षा अधिक गुन्हेगारांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आला आहे. त्यापैकी ९०० पेक्षा अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर १०२ कुख्यात गुंडांना शहरातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येत्या आठवडा भरात १०२ सराईतांना शहरातून हद्दपार करण्यात येणार आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी दिली.


ABOUT THE AUTHOR

...view details