औरंगाबाद - 'महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्याने कोरोनाचे आकडे लपवले नाहीत. ठाकरे सरकारने कोरोना मृतांची कुठलीही आकडेवारी बदललेली, लपवली नाही. पूर्वी रिपोर्ट यायला उशीर व्हायचा. त्यामुळे काही आकडे मागे पडले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी नंतर उशीरा आलेले आकडेही समाविष्ट करायाला लावले. म्हणून आकडा वाढला आहे. ही तांत्रिक चूक होती', असे औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.
औरंगाबाद पालकमंत्री सुभाष देसा औरंगाबाद पालिका निवडणूक 6 महिन्यांनी?
कोरोनामुळे औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. याबाबत निवडणुकीचे संकेत देसाई यांनी दिले आहेत. 'पुढच्या 6 महिन्यात महापालिका निवडणुका होऊ शकतात. राज्य निवडणूक आयोग त्याबाबतचा निर्णय सरकारसोबत चर्चा घेऊन करेल', असे देसाई यांनी सांगितले.
ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात नवीन गाड्या
आज (11 जून) पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना नवीन वाहने वाटप केली. 87 दुचाकी, तर 13 चारचाकी वाहने पोलिसांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी देसाईंनी कोरोना काळात पोलिसांनी केलेल्या कामाचे कौतुकही केले. 'यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात पुरुष पोलिसांसोबत महिला पोलीसही दुचाकीवर पेट्रोलिंग करतील. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या गाड्या देण्यात आल्या आहेत', असे देसाई यांनी सांगितले.
18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण लवकरच
औरंगाबाद शहरात लसींचे 3 हजारांपेक्षा जास्त डोस शिल्लक आहेत. तरीही 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना लस दिली जात नाही. यावर बोलताना देसाई म्हणाले, की 'मिळालेली लस 44 वर्षा वरील नागरिकांसाठी आहे. 18 वर्षांवरील तरुणांचे लसीकरण केंद्राने लस उपलब्ध करून देताच सुरू होईल'.
हेही वाचा -मुंबईकरांनो काळजी घ्या..! पावसाच्या पाण्यातून चालताना जखम भिजल्यास लेप्टोची शक्यता