औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ८८.३८ टक्के लागला असून, औरंगाबाद विभागाचा ७५.२० टक्के लागला आहे. दहावी परीक्षेच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.
यंदा औरंगाबाद विभागाचा निकाल घसरला; 'हा' विभाग ठरला अव्वल - girls
यंदाच्या निकालात औरंगाबाद विभागाची राज्यात पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. निकालाचा टक्का कमालीचा घसरला आहे. दहावीचा निकाल लागणार असल्याने विद्यार्थ्यांनी दुपारी १२ वाजल्यापासूनच नेट कॅफेमध्ये ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्येच दहावीचा निकाल पहिला.
राज्याचा दहावीचा निकाल ७७.१० टक्के लागला असून, निकालात तब्बल १२ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदाच्या निकालात औरंगाबाद विभागाची राज्यात पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. निकालाचा टक्का कमालीचा घसरला आहे. दहावीचा निकाल लागणार असल्याने विद्यार्थ्यांनी दुपारी १२ वाजल्यापासूनच नेट कॅफेमध्ये ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्येच दहावीचा निकाल पहिला. अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल झाल्यानंतरची ही पहिलीच परीक्षा होती. त्यामुळे गुणफुगवटा आटला आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी १० जूनपासून अर्ज करता येईल. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणार्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.