औरंगाबाद - जिल्ह्यात कोविडची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली असताना कोरोना रुग्णांना अत्यावश्यक असलेले रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. सद्यस्थितीत महिन्याकाठी जवळपास एक हजार इंजेक्शन लागत असून त्यामानाने होणारा पुरवठा कमी आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
माहिती देताना जिल्हाधिकारी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासू नये यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जवळपास सात हजार इंजेक्शनची ऑर्डर कंपनीला दिली आहे. ज्यामध्ये पाच हजार घाटी रुग्णालयासाठी तर दोन हजार जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी असणार आहेत. केलेली मागणी लगेच पूर्ण होणार नसली तरी टप्प्याटप्प्याने ही औषध मिळाली तर रुग्णांना वेळेवर उपचार देण्यात येणाऱ्या अडचणी काही प्रमाणात दूर होतील, असे मत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले.
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. त्यात अद्याप ठोस उपचार आजारावर नाही. त्यामुळे काही औषधांना घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यात एक असलेलं रेमडेसिव्हीर हे इंजेक्शन आहे. रुग्णसंख्या वाढली त्याप्रमाणे या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इंजेक्शनचा तुटवडा होत असल्याचे समोर आले. औरंगाबादेत सध्या सहा हजरांहुन अधिकचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी रोज किमान तीस ते चाळीस रुग्णांना रेमडेसिव्हीर या इंजेक्शनची गरज भासत असते. तर, कधी ही मागणी पन्नासपेक्षा जास्त असते. येथे महिन्याकाठी एक हजारांहून अधिक इंजेक्शनची गरज आहे त्यामानाने पुरवठा कमी असल्याने रुग्णांना इंजेक्शनच्या शोधत राहावं लागतं आहे. यामध्ये काळाबाजारी होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी नव्याने कंपनीला सात हजार इंजेक्शनची मागणी केली असल्याची माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
सात हजार इंजेक्शनची मागणी केली असून त्यातील पाच हजार घाटी रुग्णालयाला तर दोन हजार जिल्हा रुग्णालयासाठी मागवली असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले. मागणी जास्त केली असली तरी पुरवठा एकाचवेळी होणार नाही. मात्र, टप्प्याटप्प्याने इंजेक्शन आले तरी चालतील मात्र कोणाला कमी पडणार नाही असा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही खासगी डॉक्टर काम करण्यास येईना