औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर.. ९३ नव्या बाधितांची नोंद, एकूण रुग्णांचा आकडा 842 वर - aurangabad corona
औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी 93 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 842 झाली आहे. गेल्या 36 तासांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 23 वर पोहोचला आहे.
औरंगाबाद -जिल्ह्यात शुक्रवारी 93 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 842 झाली आहे तर दोघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये एन सहा,सिडको (2), बुढीलेन (1), रोशन गेट (2), संजय नगर (1), सादात नगर (1), भीमनगर, भावसिंगपुरा (2), वसुंधरा कॉलनी (1), वृंदावन कॉलनी (3), न्याय नगर (8), कैलास नगर (1), पुंडलिक नगर (8),सिल्क मील कॉलनी (7), हिमायत नगर (6), चाऊस कॉलनी (3), भवानी नगर (4), जुना मोंढा, भवानी नगर (1), रेहमानिया कॉलनी (4) हुसेन कॉलनी (19), प्रकाश नगर (1) शिव कॉलनी गल्ली नं. 5, पुंडलिक नगर (1), हुसेन कॉलनी, गल्ली नं. 5 (2), बायजीपुरा (7), हनुमान नगर (1), हुसेन नगर (1), अमर सोसायटी (1), न्यू हनुमान नगर, गल्ली नं.1, दुर्गा माता मंदिर (1), फुलशिवरा गंगापूर (2), बहादूरपुरा (1), रऊफ कॉलनी (1), या भागातील रुग्णांचा समावेश आहे.
वाढलेल्या रुग्णांमध्ये रामनगर - मुकुंदवाडी परिसरात रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रुग्णसंख्येबरोबर मृतांची संख्यादेखील वाढत आहे. गेल्या 36 तासांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 23 वर पोहोचला आहे.