औरंगाबाद -औरंगाबाद शहरासह आसपासच्या परिसरात जनता कर्फ्युच्या माध्यमातून लॉकडाऊन करण्यात आला. मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या या लॉकडाऊनमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळी ६६ रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार ५१० वर पोहोचली आहे. बुधवारी दिवसभरात विविध भागांमध्ये झालेल्या तपासणीत ३७९ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. यामुळे रुग्णसंख्या दहा हजारांजवळ पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार नियंत्रणात कधी येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बुधवारी सायंकाळ नंतर जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या १००५ स्वॅबपैकी ६६ रुग्णांचे अहवाल गुरुवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ९५१० कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५४९९ बरे झाले, ३७० जणांचा मृत्यू झाला. तर ३६४१ जणांवर उपचार सुरु आहेत.
गुरुवारी सकाळी प्राप्त अहवालात मनपा हद्दीतील 21 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये न्याय नगर, गारखेडा (१), संसार नगर (१), कांचनवाडी (१), छावणी (१), एन बारा सिडको (१), पीर बाजार उस्मानपुरा (१), एन चार सिडको (२), बेगमपुरा (३), प्रथमेश नगर, बीड बायपास, देवळाई रोड (१), अन्य (१), एन अकरा हडको (३),चिकलठाणा (१), जय भवानी नगर (१), पीर बाजार (१),शिव नगर (१),मिल कॉर्नर (१) येथील रुग्ण आहेत.
ग्रामीण भागात 31 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये रांजणगाव (२), पोस्ट ऑफिस जवळ, गंगापूर (१), अक्षदपार्क,कुंभेफळ (१), करमाड (१), मोठी आळी, खुलताबाद (३), पळसवाडी, खुलताबाद (६), वेरूळ (२), मोरे चौक, बजाज नगर (२), आयोध्या नगर, बजाज नगर (४), राधाकृष्ण सो., तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (१), बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाज नगर (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (१), म्हाडा कॉलनी, राम मंदिराजवळ, बजाज नगर (१), जय भवानी चौक, बजाज नगर (२), गोंडेगाव, सोयगाव (२), शास्त्री नगर, वैजापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
शहरात येणाऱ्या मार्गांवर असणाऱ्या तपासणी केंद्रात केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये १४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.