महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मतदान जागृतीसाठी धावले औरंगाबादकर; जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम - मतदान जनजागृती रॅली

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरात शनिवारी सायंकाळी क्रांती चौक ते महावीर चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली.

रॅलीसाठी येताना अधिकारी

By

Published : Oct 13, 2019, 6:40 AM IST

औरंगाबाद -नवमतदारांमध्ये जनजागृती आणि नागरिकांनी मतदान करावे यासाठी औरंगाबादमध्ये मतदान जनजागृती रॅलीचे (रन अँड वॉक फॉर डेमोक्रसी) आयोजन करण्यात आले. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरात शनिवारी सायंकाळी क्रांती चौक ते महावीर चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली.

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन


कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावा, असे आवाहन मिस इंडिया युनिव्हर्सची उपविजेती नवेली देशमुखने केले. मी सुद़्धा पहिल्यांदाच मतदान करणार असून मला प्रचंड उत्सुकता आहे, असेही नवेलीने सांगितले.

हेही वाचा- 'मुख्यमंत्र्यांचे राज्यात विरोधकच शिल्लक नाही, हे वक्तव्य लोकशाहीचा अपमान'


जिल्हाधिकारी उदय चौधरी, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनीही रॅलीत सहभागी नागरिकांना मार्गदर्शन केले. या रॅलीला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विभागाची युथ आयकॉन नवेली देशमुखने नवमतदारांना मतदान करण्याची शपथ दिली.
रॅलीमध्ये महापालिका आयुक्त निपुण विनायक, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पांडुरंग कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. टी. आर. पाटील, स्वीपचे प्रमुख व उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील रॅलीमध्ये सहभाग घेतला.


रॅलीमध्ये सहभागी नागरिकांना प्रशासनाच्यावतीने पदकांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती कार्यलयाच्यावतीने विविध कला पथकांचे सादरीकरण करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details