सोयगाव -सोयगाव तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतींसाठी नव्याने सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. शहरातील बचत भुवन हॉलमध्ये उपविभागीय अधिकारी संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रविण पांडे यांनी आरक्षण सोडत जाहीर केली. दरम्यान यावेळी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एसी, एसटी प्रवर्गाचे आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे.
'अशी' जाहीर झाली आरक्षणाची सोडत
इतर मागास प्रवर्ग महिला- घानेगावतांडा, हनुमंतखेडा, जरंडी, माळेगाव पिंप्री, वरखेडी बु. व निमखेडी येथील ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
सर्वसाधारण महिला - फर्दापुर, जगंलाताडां, उप्पलखेंडा, वरखेडी खु., बहुलखेंडा, नादगावतांडा, वाडीसुतांडा, निभोरा, जामठी, शिंदोळ, मोलखेडा आणि सावरखेंडा येथील ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
इतर मागास प्रवर्ग पुरुष - वरठाण, वनगाव, किन्ही, पळासखेडा, आमखेडा आणि घोसला ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे इतर मागास प्रवर्ग पुरुषांसाठी राखीव आहे.