औरंगाबाद - लासूर येथे होणारी अमित शाह यांची प्रचार सभा रद्द करण्यात आली आहे. खराब हवामानामुळे शाह यांचे हेलिकॉप्टर उडू शकले नसल्याने ही सभा रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गंगापूर मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रशांत बंब यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयेजन करण्यात आले होते.
लासुर येथील अमित शहा यांची जाहीर सभा रद्द हेही वाचा -आमच्याकडे भागवत सप्ताह चालण्या इतपत विकासाचे मुद्दे; अमित शाहांचे पवारांना प्रत्युत्तर
केंद्रीय गृह मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची लासुर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार होती. मात्र, खराब हवामानामुळे अमित शाह सभेच्या ठिकाणी पोहोचू शकणार नसल्याने सभा रद्द होत असल्याची घोषणा भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांनी केली.
हेही वाचा -बुलडाणा : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार अमित शहा
अमित शाह यांच्या राज्यात चार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, सकाळी कोल्हापूरला होणारी पहिली सभा जवळपास अडीच तास उशिरा सुरू झाली त्यानंतर पुढील सभांचे नियोजन बिघडल्याने उर्वरीत सभांना उशीर झाला. तिसरी सभा झाल्यावर हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टर उडण्यास अडचणी असल्याने लासुर येथे होणारी सभा रद्द करण्यात आल्याचे गंगापूर भाजप उमेदवार प्रशांत बंब यांनी सांगितले.