औरंगाबाद शहराच्या नामांतरणाबाबत शरद पवार आणि अंबादास दानवे यांच्यात मतभिन्नता छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :औरंगाबाद शहराच्या नामांतरणाचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. यावरून आता शरद पवार आणि अंबादास दानवे यांच्यात देखील असलेली मतभिन्नता दिसून आली. राष्ट्रवादी नेते शरद पवार औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर असताना त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासक समाजसेवक यांच्याशी चर्चा केली. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एमजीएम विद्यापीठ येथे शेती विषयक चर्चा सत्रात बोलत असताना समृध्दी महामार्गामुळे किती शेत जमीन गेली, याबाबत त्यांनी वक्तव्य केले.
शरद पवार यांनी केले वक्तव्य : बुधवारी जालना जिल्ह्यातून परत येत असताना समृध्दी महामार्गावरून आलो. मी शहराला औरंगाबाद म्हणेल संभाजीनगर म्हणणार नाही. रस्ता चांगला झाला, त्याबाबत बोलणार नाही. मात्र विकास होत असताना शेतजमीन मोठ्या प्रमाणात जाते, औद्योगिक विकास असो की रस्ते मोठ्या प्रमाणात शेत जमीन जाते, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
विचारसरणी वेगळी असू शकते :शरद पवार आणि राष्ट्रवादीची विचारसरणी वेगळी असू शकते. त्यांना काय म्हणायचे ते म्हणू द्या, या शहराचे नामांतर झालेले आहे. ते नागरिकांनी स्वीकारले आहे, असे मत ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले. शरद पवारांच्या वक्तव्याला मी उत्तर द्यावे, अशातला काही भाग नाही. शरद पवार यांची आणि राष्ट्रवादीची काही वेगळी विचारसरणी असू शकते. शरद पवारांना काय म्हणायचे, ते म्हणू द्या. या शहराचे नामांतरण झालेले आहे. न्यायालयाने देखील त्यात स्थगिती दिली असली तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ठराव मंजूर केला आहे, असे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
- Diva BJP Protest : मुख्यमंत्र्यांच्या सभेदरम्यान भाजप नेत्यांची निदर्शने, पाणीटंचाई दूर करण्याची मागणी
- Kolhapur will be peaceful : धगधगतं कोल्हापूर शांत होईल, संघटनांकडून ग्वाही, पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती
- supriya sule : 'बेटी पढाओ, बेटी बचाओ'चा नारा देणारे सरकार बेटीला न्याय देण्यात अपयशी - सुप्रिया सुळे