महाराष्ट्र

maharashtra

औरंगाबादमध्ये लॅाकडाऊन नव्हे तर "ब्रेक दि चेन"

By

Published : Apr 6, 2021, 3:34 PM IST

औरंगाबाद शहरात कारोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने "ब्रेक दि चेन" अंतर्गत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही निर्बंध लावले आहेत. 5 एप्रिल ते 30 एप्रिल यादरम्यान 'ब्रेक दि चेन' हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

Aurangabad Corona
जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

औरंगाबाद - शहरात दररोज पंधराशे पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने "ब्रेक दि चेन" अंतर्गत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जे निर्बंध लावले आहेत, त्याची पूर्णपणे अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे औषधे, किराणा, भाजीपाला, दूध डेअरी, बेकरी, मिठाईचे दुकान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. हा लॅाकडाऊन नव्हे तर ब्रेक द चेन आहे. आपण सर्वजण मिळून कोरनाची साखळी तोडू असेही ते म्हणाले.

औरंगाबादमध्ये लॅाकडाऊन नव्हे तर "ब्रेक दि चेन"

हे सुरू राहील...

  • सर्व शासकीय कार्यालये सुरू राहतील. मात्र कोणत्याही अभ्यागतांना त्या ठिकाणी परवानगी घेतल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
  • औषधांची दुकाने, किराणा, भाजीपाला, दूध डेअरी, बेकरी, मिठाईचे दुकान हे सुरू राहतील.
  • रिक्षा, बस सेवा, खाजगी व एसटी महामंडळाच्या बसेस सुरू राहतील. मात्र त्यांना 50 टक्के क्षमतेसह वाहतुकीची परवानगी असेल. रिक्षामध्ये रिक्षा ड्रायव्हर आणि दोन प्रवासी यांनाच मास्कसह परवानगी राहील.
  • पावसाळा जवळ येत असल्यामुळे मान्सूनपूर्व कामे करण्यास मुभा राहील.
  • अत्यावश्यक वस्तूंच्या विक्री करणाऱ्या दुकानांना मालाचा पुरवठा करणारी वाहतूक सुरू राहील. शेतीशी संबंधित सेवा सुरू राहतील.
  • प्रसिद्धी माध्यमे सुरू राहतील. प्रसार माध्यमांची कार्यालये वर्तमानपत्रांची छपाई व वितरण व्यवस्था सर्व सुरू राहील.
  • खासगी वाहतूक सेवा आणि एसटी महामंडळाची सेवा सोमवार ते शुक्रवार पर्यंत सुरू राहील तसेच त्यांची तिकीट कार्यालये सुरू राहतील. प्रवासात प्रवाशांना मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. एखादा जरी प्रवासी विना मास्क आढळल्यास प्रवासी व बस ऑपरेटरकडून दंड वसुल करण्यात येईल.
  • लग्न समारंभांना 50 निमंत्रितांच्या उपस्थितीसह परवानगी असेल. परंतु, लग्नसमारंभासाठी येणाऱ्या लोकांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर अगोदर प्रशासनाकडे द्यावे लागेल. त्याशिवाय केटरिंगची व्यवस्था करणाऱ्यांचे लसीकरण आणि आरटीपीसीआर चाचणी झाल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याजवळ ठेवाव लागेल. केटरर्सच्या एखाद्या कर्मचाऱ्याकडे आरटीपीसीआर चाचणी झाल्याचे प्रमाणपत्र नसेल तर त्या व्यक्तीकडून एक हजार रुपये तर त्याच्या मालकाकडून दहा हजार रुपयांचा दंड आकारला जाईल.
  • अंत्ययात्रेसाठी वीस लोकांनाच परवानगी असेल. त्यांचेही नाव, नंबर व पत्ता द्यावा लागेल.
  • सर्व कारखाने सुरू राहतील. ज्या कारखान्यांमध्ये पाचशेपेक्षा जास्त कामगार असतील त्यांनी स्वतःच आयसोलेशन सेंटर सुरू करावे. जर एखादा कामगार पॉझिटिव्ह निघाला तर त्याचा पगार कापू नये. त्याला आजारी रजा देण्यात यावी. ऑक्सिजन उत्पादक कंपन्या सुरू राहतील. ई-कॉमर्स सेवा सुरू राहतील. ज्या ठिकाणी कामगारांना राहण्याची व्यवस्था आहे अशा ठिकाणीच बांधकाम सुरू राहतील. एखादा बांधकाम मजूर आजारी पडला तर त्याला त्या बिल्डरने पगारी रजा द्यावी.
  • रस्त्यावरचे खाद्य विक्रेते सकाळी सात ते रात्री आठ या वेळेतच फक्त पार्सल सेवा देऊ शकतात. त्यांना तिथे खुर्च्या टाकून खाद्यपदार्थांची विक्री करता येणार नाही. 10 एप्रिलपासून त्यांच्यासाठी हा निर्णय लागू होईल, तोपर्यंत त्यांनी लसीकरण केल्याचे आणि आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र जवळ ठेवणे बंधनकारक असेल.
  • वकिलांची कार्यालये सुरू राहतील.
  • कार्गो सर्विसेस, सेक्युरिटी सर्विसेस, डेटा सर्विसेस सुरू राहतील. नॅान बँकिंग फाइनान्शियल सेवा, मायक्रो फायनान्स सेवा सुरू राहतील.

हे बंद राहणार...

  • किराणा मालाची दुकानं, दुध डेअरी, भाजीपाला, बेकरी, मिठाईचे दुकान, औषधी दुकान हे वगळता सर्व आस्थापना बंद राहतील.
  • धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद राहतील. मात्र त्या धार्मिक स्थळातील धार्मिक विधी सुरू राहतील. त्यासाठी केवळ दोन जणांना धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश दिला जाईल. धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रम पूर्णपणे बंद राहतील
  • मनोरंजनाची सर्व ठिकाणे नाट्यगृह, चित्रपटगृह, म्युझिकल क्लब, क्रीडासंकुल, स्विमिंग पूल बंद राहतील.
  • सलून, स्पा, ब्युटी पार्लर बंद राहतील.
  • शाळा कॉलेजेस पूर्णपणे बंद राहतील. मात्र पूर्वनियोजित सर्व परीक्षा चालू राहतील.
  • पर्यटनाच्या दृष्टीने शहरात आलेल्या व मोठ्या हॉटेलमध्ये थांबलेल्या पर्यटकांसाठी इनडोर बार सुरू राहतील, परंतु इतर सर्व बार पूर्णपणे बंद राहतील.

हेही वाचा -LIVE UPDATE : राज्यातील कोरोनासंदर्भातील ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

ABOUT THE AUTHOR

...view details