महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आकाशने परश्यासारखी उडी मारली, तो माझ्यासाठी देवदूत' - शौैर्य पुरस्कार

हातमाळी गावातून जाणाऱ्या दुधना नदी पात्रात गावातील रेणुका मस्के ही महिला धुणे धूत होती. त्यावेळी त्यांची मुलगी श्रद्धा तोल जाऊन नदीत पडली. श्रद्धाला वाचवण्यासाठी रेणुकाने कुठलाही विचार न करता नदीत उडी मारली. मात्र, श्रद्धाला वाचवत असताना त्यादेखील पाण्यात बुडायला लागल्या. त्याचवेळी तेथून जात असताना जिवाच्या आकांताने 'वाचवा-वाचवा' असा आवाज आकाशच्या कानावर आला. त्याने प्रसंगावधान राखत आवाजाच्या दिशेने धाव घेतली.

bravery award
'आकाशने परश्यासारखी उडी मारली, तो माझ्यासाठी देवदूत'

By

Published : Jan 22, 2020, 9:26 PM IST

औरंगाबाद - जिल्हयातील हातमाळीच्या आकाश खिल्लारेला २०१९ चा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. आकाशने त्याच्या गावातील रेणुका आणि श्रद्धा या मायलेकींना पाण्यात बुडताना वाचवले होते. 'आकाशने माझ्यासाठी सैराटच्या परश्यासारखी उडी मारली. तो देव असून त्याचे उपकार कधीही विसरणार नाही. त्याच्या पुण्याने त्याला हा पुरस्कार मिळाला', अशी भावना रेणुका मस्के यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

औरंगाबदच्या हातमाळीच्या आकाश खिल्लारेला २०१९ चा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर

हेही वाचा - डोळ्यापुढे धूर.. गुदमरणारा श्वास..अन् आक्रोश.. 'झेन'ने सांगितला आगीचा थरार

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. देशाच्या १२ राज्यांमधली २२ बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील झेन सदावर्ते आणि आकाश खिल्लारे यांचा समावेश आहे.

हेही वाचा - बंगळुरुच्या १७ वर्षीय यश अराध्याची गरूडझेप

औरंगाबाद जिल्हयातील आकाश खिल्लारे याने २२ जानेवारी २०१८ साली नदीत बुडत असताना मायलेकीचे प्राण वाचवले होते. हातमाळी गावातून जाणाऱ्या दुधना नदी पात्रात गावातील रेणुका मस्के ही महिला धुणे धूत होती. त्यावेळी त्यांची मुलगी श्रद्धा तोल जाऊन नदीत पडली. श्रद्धाला वाचवण्यासाठी रेणुकाने कुठलाही विचार न करता नदीत उडी मारली. मात्र, श्रद्धाला वाचवत असताना त्यादेखील पाण्यात बुडायला लागल्या. त्याचवेळी तेथून जात असताना जिवाच्या आकांताने 'वाचवा-वाचवा' असा आवाज आकाशच्या कानावर आला. त्याने प्रसंगावधान राखत आवाजाच्या दिशेने धाव घेतली. दुधना नदीत दोघी बुडत असल्याचे त्याला आढळून आले. आजुबाजुला कोणीही मदतीला नाही हे पाहताच आकाशने या दोघींना वाचविण्यासाठी ७० फूट खोल नदीत उडी मारली. जेव्हा आकाश महिलेला बाहेर काढण्यासाठी गेला, तेव्हा तिथे त्या महिलेची लहान मुलगीही बुडत असल्याचे त्याने पाहिले. या दोघींनाही त्याने नदीतून सुरक्षितरित्या बाहेर काढले.

हेही वाचा - विम्याची 'ती' रक्कम जीवनानंतर नव्हे जीवनातच; राज्य ग्राहक मंचाने एलआयसीला असा दिला दणका

आकाशने प्रसंगावधान राखून धाडसाचा परिचय देत या मायलेकींचे प्राण वाचविल्याबद्दल त्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 'आकाशला पुरस्कार मिळाल्याची बातमी ऐकून आनंद झाला, तो माझ्यासाठी देवदूत आहे' अशी भावना रेणुका मस्के यांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details