महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Youth Suicide : ऑनलाइन गेममध्ये 50 हजार रुपये हरला, तरुणाने संपवले आयुष्य - the young man ended his life

ऑनलाइन गेममध्ये एक तरुण 50 हजार रुपये हरला. मामाने पैसे दिले तरी तणाव जाणवत असल्याने २३ वर्षीय तरुणाने आत्महत्येचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना शहरात घडली. गौरव पवार असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

Young Suicide in lake
तरुणाची आत्महत्या

By

Published : May 6, 2023, 4:04 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):याप्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव चंद्रकांत पवार हा 23 वर्षीय युवक टिव्ही सेंटर पवण नगर राहत होता. त्याचे मेकॅनिकल डिप्लोमा पर्यंत शिक्षण पूर्ण झाले आहे. वडील शेती करतात तर आई गृहिणी आहे. सध्या तो एका खासगी कंपनीत काम करत होता. गौरव हा एकुलता एक मुलगा असून त्याला दोन बहिणी असून त्यांचे लग्न झालेले आहे. गौरवला गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन गेम खेळण्याची सवय लागली होती. गेम खेळत असताना, तो पन्नास हजार रुपये हरला होता असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. हरलेले पैसे भरण्यासाठी गौरवच्या मामाने त्याला मदत करत चाळीस हजार रुपये दिले. मात्र तरीही तो तणावात होता. त्याची अनेकांनी समजूत काढण्याचे प्रयत्न केले; मात्र त्याचा ताण कमी होत नव्हता.

आत्महत्येचे उचलले पाऊल:शुक्रवार दि.५ मे रोजी सकाळी गौरवने सकाळी घरी वडिलांसोबत जेवण केले. आई-वडिलांना बीड येथे जाण्यासाठी गाडीत बसवून दिले. दुपारच्या सुमारास गौरव हा हर्सूल तलाव परिसरात आला काही. वेळ तो तलावाच्या काठावर बसलेला होता. बराच वेळ गेल्यानंतर त्याने तलावात उडी घेतली. ही बाब सुरक्षारक्षक राजेश गवळे याच्या लक्षात येताच घटनेची माहिती हर्सूल पोलिसांना दिली. पोलिसांच्या मदतीने गौरवला बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार एस. आर. वाघ करीत आहे. घटनेची माहिती मिळताच नातवेईकांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्याची आई, वडील, बहीण यांनी टाहो फोडला. गेम खेळताना सावध राहण्याची गरज निर्माण झाल्याचे या निमित्ताने समोर आले.

ABOUT THE AUTHOR

...view details