महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रशासनाने अडवलं तरी आंदोलन होणार - खासदार जलील यांचा इशारा - खासदार जलील

प्रशासनाने कितीही विरोध केला तरी 31 मार्चला आंदोलन होणारच, हे आंदोलन आमच्या रास्त मागण्यांसाठी आहे. तुम्ही एकदा अडवलं तर आम्ही दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरू. मात्र, आंदोलन होणारच असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.

जलील यांचा लॉकडाऊनला विरोध
जलील यांचा लॉकडाऊनला विरोध

By

Published : Mar 30, 2021, 4:25 PM IST

Updated : Mar 30, 2021, 5:14 PM IST

औरंगाबाद - प्रशासनाने कितीही विरोध केला तरी 31 मार्चला आंदोलन होणारच, हे आंदोलन आमच्या रास्त मागण्यांसाठी आहे. तुम्ही एकदा अडवलं तर आम्ही दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरू. मात्र, आंदोलन होणारच असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.


वैद्यकीय रिक्त जागा भरण्यासाठी आंदोलन....
मागील एक वर्षापासून कोरोनाचा कहर सर्वत्र पाहायला मिळतोय.औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास 2047 रिक्त जागा शासकीय रुग्णालयात आहेत.अद्याप त्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. मागील एक वर्षांपासून वैद्यकीय सेवेत येणारा ताण वाढत चालला आहे. दवाखान्यात कामावर रुजू असणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सुट्टी देखील मिळत नाही.दिवस-रात्र त्यांना काम करावे लागत आहे.अशा परिस्थितीत या रिक्त जागा भरल्या तर, सध्या काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर येणारा ताण कमी होऊ शकतो. आम्हाला आता रस्त्यावर उतरावं लागणार आहे.निश्चितच पोलीस परवानगी देणार नाहीत.मात्र, आमची मागणी जास्त महत्त्वाची असल्याने आम्ही रस्त्यावर उतरणार असा इशारा खा. जलील यांनी जिल्हा प्रशासनाला दिला.

खासदार जलील यांचा इशारा

हेही वाचा -कोरोनाने महिलेचा मृत्यू, नातेवाईकांनी केलं गुपचूप अंत्यसंस्कार, पुढे काय घडलं वाचा...

लॉकडाऊन मध्ये उद्योगांना परवानगी नसावी.
औरंगाबाद जिल्ह्यात ३१ मार्च ते ९ एप्रिल या काळात लॉकडाउन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. यात उद्योग क्षेत्र सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मागील वर्षभराची रुग्ण संख्येची आकडेवारी पाहिली तर वाळूज, बजाज नगर, शेंद्रा या भागांमध्ये सर्वाधिक नवीन रुग्ण आढळून येत आहे. याच भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती असल्याने या ठिकाणी रुग्ण संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत हॉटस्पॉट ठरलेल्या भागांनाच बंदमधून सूट का देण्यात आली? असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी जिल्हा प्रशासनाला विचारला आहे. जर बंद करायचा असेल तर संपूर्ण बंद करा म्हणजे कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात येईल असं मत खा. जलील यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा -परिस्थिती अशीच राहिली तर मुंबईत लॉकडाऊन - अस्लम शेख

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लॉक डाऊन पर्याय नाही...
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचे मत अनेक अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभाग सर्वेक्षण प्रमुखांनी देखील लॉक डाऊन हा पर्याय नसल्याचं सांगितला आहे. मागील वर्षी आपल्यासाठी आजार नवीन होता. त्यावेळी आपल्याकडे आरोग्य यंत्रणा सज्ज नव्हती. आणि ही यंत्रणा सज्ज करण्यासाठी कालावधी गरजेचा असल्याने लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र आज एक वर्ष पूर्ण झाले आणि या काळात आपली यंत्रणा बर्‍यापैकी सज्ज झालेली असल्याने आता लॉक डाऊनची गरज नाही. मात्र तरी काही प्रतिनिधी याबंदला समर्थन देत असले तरी देखील आम्ही समर्थन देऊ शकत नाही असं मत खा. दिली यांनी व्यक्त केले.

Last Updated : Mar 30, 2021, 5:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details