छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी संचालक मंडळासह 50 जणांवर 91 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी एक तर 101 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी एक असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. सहकार विभागाच्या लेखा परीक्षण अहवालाच्या माध्यमातून हा घोटाळ समोर आला असुन या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच ठेविदारांची झोप उडाली आहे. या प्रकरणात खासदार इम्तियाज जलील यांनीही संचालकांना विचारणा केली असून ठेविदारांचे पैसे वापस मिळावे यासाठी मोर्चा काढणार असल्याचे म्हणले आहे.
ठेविदाराची आत्महत्या : जीवनभराची जमापुंजी विश्वासाने या पतसंस्थेत ठेवणाऱ्या ठेविदारां या प्रकारामुळे त्रस्त आहेत. आपला हक्काचा पैसा वापस मिळावा यासाठी ते बॅंकेत चकरा मारत आहेत. यातच अशाच एका चिंताग्रस्त 38 वर्षीय शेतकरी ठेविदाराने. पतसंस्थेत 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळऴळजनक घटना समोर आली आहे. ही घटना औरंगाबाद तालुक्यातील लाडगाव येथे घडली, रामेश्वर नारायण इथर असे मृताचे नाव आहे. रामेश्वर यांनी मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाची तजवीज म्हणून ही रक्कम पतसंस्थेत जमा केली होती.
संचालक अटकेत :आदर्श बँकेतील 200 कोटी घोटाळ्याप्रकरणी अध्यक्ष अंबादास मानकापे यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज परिसरातील साउथ सिटी गोलवाडी येथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे असून त्यांना अटक करण्याची मागणी ठेवीदारांनी केली होती. आदर्श पतसंस्थेमध्ये 200 कोटी घोटाळा झाल्याचा गुन्हा गुन्हा दाखल झाल्या नंतर तीन दिवसातच मुख्य आरोपीला पकडण्यात सिडको पोलिसांना मोठे यश आले आहे. तीन हजारहून अधिक ठेवीदारांची पतसंस्थेत कोट्यावधींची गुंतवणूक आहे.
प्रशासक नेमण्याची मागणी :कुठलीही शहाणा शेख करता आदर्श नागरी बँकेने 200 कोटीहून अधिकची रक्कम वाटली. त्यामुळे बँक साचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वसामान्यांचे पैसे घेऊन आपल्या नातेवाईकांना, निकटवर्ती यांना कुठलेही तारण किंवा गॅरेंटर न घेता कर्जवाटप करण्यात आले. तीन दिवसांपूर्वी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अनेक ठेवीदार बँकेच्या समोर ठिय्या मांडून बसले होते आणि बँकेच्या संचालक मंडळावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यात आता आदर्श बँक आणि त्याच्या संलग्न असलेल्या इतर शाखांवर तातडीने प्रशासक नेमावा अशी मागणी भाजप आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली आहे. इतकेच नाही तर ज्या लोकांना कोट्यावधीचा कर्ज यांनी वाटलं त्या संस्थांवर देखील प्रशासक नेमून चौकशी करावी अशी देखील मागणी बागडे यांनी केली आहे.
हेही वाचा :
- Adarsh Bank 200 Crore Scam: आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा; खासदार इम्तियाज जलील काढणार ग्राहकांसाठी काढणार निषेध मोर्चा
- 200 crore scam: आदर्श नागरिक सहकारी बँकेत दोनशे कोटींचा घोटाळा, संचालक मंडळावर गुन्हा दाखल