महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत पुन्हा पीडितेवर बलात्कार, जामिनावर सुटून आलेल्या आरोपीचे कृत्य - sagar suni shreesundar aurangabad

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याच मुलीवर बलात्कार केला आहे. सागर सुनील श्रीसुंदर (रा.शांतीपुरा,छावणी) असे आरोपीचे नाव आहे.

जामिनावर सुटून आलेल्या आरोपीचा पुन्हा 'त्याच' अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By

Published : Oct 11, 2019, 3:43 PM IST

Updated : Oct 11, 2019, 5:23 PM IST

औरंगाबाद - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याच मुलीवर बलात्कार केला आहे. सागर सुनील श्रीसुंदर (रा.शांतीपुरा,छावणी) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या नराधमाविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छावणीतील शांतीपुरा भागात राहणारी 16 वर्षीय पीडीत मुलगी दररोज सायंकाळी परिसरातील एका प्रार्थना स्थळी जात असते. मुलगी प्रार्थना करून घराकडे जात असताना आरोपीने तिला रस्त्यात अडविले. त्याने पीडीतेला मारहाण करून सोबत आणलेल्या रिक्षात बसवले. 'माझ्यावर केस का केली', अशी विचारना करत आरोपी तीला छावणीतील स्मशानभुमीकडे घेऊन गेला. त्यांना तिथे सोडून रिक्षावाला निघून गेल्यानंतर त्याने पीडीतेवर बलात्कार केला.

हेही वाचा - धक्कादायक.. चिमुरडीसमोरच विवाहितेवर सामूहिक बलात्कार, दिले सिगरेटचे चटके व विष पाजून फेकले रस्त्यावर

पीडीतेने रात्री दहा वाजता आरोपीच्या तावडीतुन सुटका करून घेत घर गाठले आणि घडलेला प्रकार आई व मावशीला सांगितला. त्यानंतर 7 ऑक्टोबरला छावणी पोलीस ठाण्यात आरोपी सागर श्रीसुंदर विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी, पोलीस निरीक्षक मनोज पगारे अधिक तपास करत आहे

Last Updated : Oct 11, 2019, 5:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details