महाराष्ट्र

maharashtra

खैरेंना समजून घेण्यापेक्षा शिवसेना समजणे महत्त्वाचे - अंबादास दानवे

By

Published : Mar 20, 2021, 12:57 PM IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शेतकरी विकास पॅनलतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विरोधकांनी केलेल्या टीकेला हरिभाऊ बागडे यांनी प्रत्युत्तर दिले.

Ambadas Danve
अंबादास दानवे

औरंंगाबाद - 'खैरे सारख्यांना समजण्याची गरज काय? शिवसेना समजली पाहिजे. मी कोणालाही घाबरत नाही, असे म्हणत आमदार आंबादास दानवे यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैंरे यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले. शेतकरी विकास पॅनलतर्फे शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते.

शेतकरी विकास पॅनलतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्यात आली
मी ही निवडणूक पहिल्यांदाच लढवत आहे. गेल्या पंचवार्षिकला देखील याच पद्धतीने निवडणूक लढवली गेली होती. त्याच पद्धतीने यंदाची निवडणूक देखील लढवली जात आहे. शेतकरी विकास पॅनलमध्ये शिवसेनेच्या दोन मंत्र्यांसह एक आमदार व चार पदाधिकारी आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंची काय खदखद होती ती त्यांनी मला बोलून सांगायची होती. मी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असते. मात्र, त्यांनी जाहिरपणे आपले गाऱ्हाणे गायले. ही कोणती शिस्त आहे? असे म्हणत अंबादास दानवे यांनी नाराजी व्यक्त केली.वय झाल म्हणजे कोणी वरिष्ठ होत नसते - हरीभाऊ बागडे

हरिभाऊ बागडे यांचे आता वय झाले आहे. त्यामुळे त्यांनी आता थांबावे, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली होती. 'माझे वय झाले असले तरी आजही चांगली कामे करतो. त्यांना बघायचे असेल तर त्यांनी दौलताबादचा किल्ला चढायची शर्यत लावावी. किल्ला चढताना कोण थकते हे बघावे,' असे प्रत्युत्तर आमदार हरीभाऊ बागडे यांनी शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांना दिले. फक्त वय वाढून कोणी वरिष्ठ होत नसतो. त्यासाठी व्यक्तीचे कर्तृत्व गरजेचे असते, असेही बागडे म्हणाले.


माझ्या संस्थेत एकही बागडे नावाचा सदस्य नाही - बागडे

संस्थांची पद मिळवणे म्हणजे एखाद्या नेत्याला भेटून पद मिळवण्या इतके सोपे नाही. त्यासाठी निवडणूक लढवून निवडूण यावे लागते. माझ्या शिक्षण संस्थेत ३५ वर्ष मी चेअरमन आहे परंतू संस्थेत एकही बागडे नावाचा सदस्य नाही. त्यांच्या संस्थेत तर सर्व सदस्य घरचे आहेत. संस्था निर्माण करणे महत्त्वाचे नसून संस्था चालवणे महत्त्वाचे असल्याचे आमदार बागडे म्हणाले.

शेतकरी सहकारी बँक विकास पॅनलमधील ७० टक्के उमेदवारांवर गुन्हे - हरिभाऊ बागडे

शेतकरी सहकारी बँक विकास पॅनलमधील ७० टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांनी सर्व माहिती घेऊनच आमच्यावर आरोप करावेत. त्यांच्याच पँनलमधीस एका उमेदवाराला वर्धमान नागरी सहकारी बँकेने नोटीस पाठवली आहे. त्याच्यावर १०१ प्रमाणे कारवाई देखील झाली आहे. जगन्नाथ काळे यांनी प्रेरणा सहकारी बँकेत एकाच दिवशी १ हजार ६०० सभासद केले. डॉ. कल्याण काळे यांच्या गावातील विकास सोसायटीत सर्व नातेवाईकांचीचं नावे आहेत. त्यातील काही जालना जिल्ह्यातील आहेत. हे सहकार क्षेत्राच्या नियमात बसत नसल्याचे बागडे म्हणाले.

हेही वाचा -राज्यात शुक्रवारी 25 हजार 681 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

ABOUT THE AUTHOR

...view details