औरंगाबाद- शहर सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी 'आओ शहर सुंदर बनाये, या उपक्रमाअंतर्गत ३ टप्प्यात शहराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शहराच्या स्वच्छतेवरती भर देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात शहराच्या प्रवेश मार्गावरील भिंतीवरती आपल्या शहराची ऐतिहासिक माहिती दर्शविणारी चित्रे काढण्यात येणार आहेत. तर तिसऱ्या टप्प्यात रस्त्यावरती रमलर बसविणे, दुभाजक रंगविणे, अशी विविध रस्ते कामे करण्यात येणार आहे.
औरंगाबादमध्ये 'आओ शहर सुंदर बनाये' अभियान; ३ टप्प्यात शहराचे सौंदर्यीकरण - aao shahar sundar banaye
या उपक्रमाअंतर्गत ३ टप्प्यात शहराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. 'आओ शहर सुंदर बनाये' या स्वछता मोहिमेत शहरातील जास्तीत जास्त नागरिक, स्वयंसेवी संस्था यांनी सहभाग घेऊन या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन मनपा अतिरिक्त आयुक्त मंजुषा मुथा यांनी केले आहे.
आजपासून या अभियानाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त मंजुषा मुथा यांनी दिली आहे. सर्व वार्ड अधिकाऱ्यांनी याचे नियोजन केले असून यासाठी प्रत्येक वार्डसाठी सहायक आयुक्त दर्जाचे पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. यासोबतच यात सर्व नगरसेवक, पदाधिकारी, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, स्वच्छता निरीक्षक, जवान, सफाई कर्मचारी, मनपा निगडित बचतगट कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग असणार आहे.
यात शहरात ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात कचरा साचला आहे, तिथे ही मोहीम राबविली जाणार आहे. तसेच नाल्याच्या काठावरती साचलेला कचरा उचलून तो कचरा प्रक्रिया केंद्रावरती टाकला जाणार आहे. 'आओ शहर सुंदर बनाये' या स्वछता मोहिमेत शहरातील जास्तीत जास्त नागरिक, स्वयंसेवी संस्था यांनी सहभाग घेऊन या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन मनपा अतिरिक्त आयुक्त मंजुषा मुथा यांनी केले आहे.