पैठण (औरंगाबाद)- औरंगाबाद - पैठण मार्गावरील लोहगाव फाटा येथे झालेल्या अपघातात एकाचा जागेवर मृत्यू झाला आहे. कायम वर्दळीच्या या मार्गावर रिक्षा चालक अजिज बेग (वय ५५) नेहमीप्रमाणे प्रवासी वाहतूक करत होते. त्यांच्या रिक्षाला मागून येणाऱ्या आयशर ट्रकने (एम.एच. १६-क्यू-५७०६) जोरदार धडक दिली. यात बेग गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी बेग यांना तपासून मृत घोषित केले.
औरंगाबाद - पैठण मार्गावर आयशरची रिक्षाला जोरदार धडक, चालक ठार - पैठण - औरंगाबाद मार्गावर अपघात
औरंगाबाद - पैठण मार्गावरील लोहगाव फाटा येथे झालेल्या अपघातात एकाचा जागेवर मृत्यू झाला आहे. कायम वर्दळीच्या या मार्गावर रिक्षा चालक अजिज बेग (वय ५५) नेहमीप्रमाणे प्रवासी वाहतूक करत होते. त्यांच्या रिक्षाला मागून येणाऱ्या आयशर ट्रकने (एम.एच. १६-क्यू-५७०६) जोरदार धडक दिली. यात बेग गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी बेग यांना तपासून मृत घोषित केले.
अजिज बेग हे त्यांच्या रिक्षाने कौडगाव येथून ढोरकीनकडे प्रवासी भाडे घेऊन जात होते. लोहगाव फाट्याजवळ मागून येणाऱ्या भरधाव आयशरने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक बेग हे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्याला कळताच सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक चौरे, पोलीस उपनिरीक्षक राहुल भदर्गे, बीट जमादार दिनेश दाभाडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी रिक्षाचालक बेग यांना शासकीय रुग्ण वाहिकेतून बिडकीन ग्रामीण रुग्णालायत दाखल केले. तिथे डॉ. शैलेश घोडके यांनी बेग यांना तपासून मृत घोषित केले.