औरंगाबाद -लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना झाली. गौताळा अभयारण्यत हा प्रकार झाला. याबाबत कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपीने चिकलठाण येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून गौताळा अभयारण्यात नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पुण्यातील वाकड येथे बोलवून आरोपीने पुन्हा अत्याचार केला. पीडित मुलीने कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.