औरंगाबाद - बाबासाहेब वीर या मेंढपाळाचा रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यानंतर संबधित ठेकेदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी मृतदेह चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात नेला. अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी बाबासाहेब यांचा मृतदेह मूळगावी परत नेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
औरंगाबादमध्ये खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू, कुटुंबीयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठेवला मृतदेह
बाबासाहेब वीर या मेंढपाळाचा रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंधारात कामासाठी खोदलेला खड्डा न दिसल्याने बाबासाहेब खड्ड्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बाबासाहेबांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
बाबासाहेब वीर
औरंगाबाद जिल्ह्यातील लांची गावाजवळ पुलाचे काम सुरू होते. मात्र त्या ठिकाणी चेतावणी देणारा कुठलाही फलक लावण्यात आलेला नव्हता. त्यामुळे अंधारात कामासाठी खोदलेला खड्डा न दिसल्याने बाबासाहेब खड्ड्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बाबासाहेबांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शहरातील घाटी रुग्णालयात बाबासाहेब यांचे शवविच्छेदन करण्यात आले.