औरंगाबाद - घरासमोरील पार्किंगमध्ये दारू पित असलेल्या तरुणांना दारु पिण्यास मज्जाव केला, म्हणून त्यांनी घरमालकाची दुचाकी पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची घटना 9 जून रोजी रात्रीच्या सुमारास जिन्सीतील रविंद्र नगरमध्ये घडली.
दारू प्यायला मज्जाव केल्याने मद्यपींनी घरमालकाची दुचाकी जाळली - शेख समीर
घरासमोर दारू पित असलेल्या तरुणांना दारू पिण्यास रोखले म्हणून मद्यपिणी घरमलकाची दुचाकी जाळली.
अब्दुल रऊफ मोहमंद युसूफ, ५० (रा. रविंद्र नगर) यांच्या घरासमोर संशयित आरोपी शेख समीर, (२३, रा. रवींद्रनगर) हा ९ जून रोजी रात्री मित्रासोबत दारू पित होता. अब्दुल रऊफ यांनी त्यांना तेथे दारू न पिण्याची विनंती केली. तेव्हा आरोपींनी त्यांना धमकी देत पोबारा केला.
त्याच रात्री घरासमोर उभ्या असलेली त्यांच्या दुचाकीवर (एम एच २१ ए एच - ७०३०) पेट्रोल टाकून ती जाळण्यात आली. हा प्रकार समीरनेच केल्याची तक्रार रफत यांनी दिल्यानंतर त्याच्यावर जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.