महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत 'जय श्रीराम' म्हणण्याची सक्ती करून मुस्लीम तरुणाला मारहाण; हिंदू दाम्पत्याने पिटाळले गुंडांना - मुझफ्फरनगर

औरंगाबाद शहरातील हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगर येथे कामावरून घरी जाणाऱ्या मुस्लीम तरुणास अडवून मारहाण करीत जय श्रीराम बोलण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुस्लिम तरूणाला मारहाण करत जय श्रीराम बोलण्यास भाग पाडले

By

Published : Jul 19, 2019, 4:24 PM IST

Updated : Jul 19, 2019, 7:57 PM IST

औरंगाबाद - हॉटेलमधील काम आटोपून घरी जाणाऱ्या मुस्लीम वेटर तरुणास अडवून मारहाण करीत त्याला जय श्रीराम म्हणण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबादमधील हडको भागातील मुझफ्फरनगर येथे ही घटना घडली आहे. इम्रान पटेल (वय-28) असे पीडित तरुणाचे नाव आहे. बेगमपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुस्लीम तरुणाला मारहाण करून म्हणायला लावले जय श्रीराम

इम्रान पटेल हा कटकटगेट भागातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास तो कामावरून घरी निघाला होता. शहरातील हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगरात तो पोहोचला असता त्याला ८ ते १० तरुणांच्या टोळक्याने अडवून बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याला 'जय श्रीराम' म्हणण्यासही भाग पाडले. यावेळी इम्रानने ३ वेळा 'जय श्रीराम' म्हटले. त्यानंतरही टोळक्याने इम्रानला मारहाण केली.

यावेळी मारहाण होत असल्याचे पाहून एका हिंदू दाम्पत्याने इम्रानची टोळक्याच्या तावडीतून सुटका करत मारहाण करणाऱ्या टोळक्याला पिटाळून लावले. ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात एमआयएम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली.

दरम्यान, यासंदर्भात गुन्हा दाखल झाला असून आम्ही घटनेचा तपास करीत आहोत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.

Last Updated : Jul 19, 2019, 7:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details