औरंगाबाद- मानवाने चंद्रावर पाऊल ठेवल्याच्या घटनेला आज(20 जुलै) पन्नास वर्षे पूर्ण झाले. अमेरिकेने चंद्रावर जाण्याची घोषणा 1962 मध्ये केली होती. मात्र, 1969 पर्यंत जवळपास 10 चाचण्या केल्यानंतर अकराव्या वेळी चंद्रावर पाय ठेवण्यात मानवाला यश मिळाले आहे.
अभिमानास्पद! मानवाने चंद्रावर पाऊल ठेवल्याच्या घटनेला 50 वर्ष पूर्ण - 50 वर्ष पूर्ण
20 जुलै 1969 मध्ये अमेरिकन अंतराळवीर निल आर्मस्ट्राँग याने चंद्रावर पाऊल ठेवले. अपोलो 11 या मोहीमेअंतर्गत 'ईगल यान' चंद्रावर उतरवले आणि चंद्रावर पाऊल ठेवण्याचा मान निल आर्मस्ट्राँग याने मिळवला.
20 जुलै 1969 मध्ये अमेरिकन अंतराळवीर निल आर्मस्ट्राँग याने चंद्रावर पाऊल ठेवले. अपोलो 11 या मोहीमेअंतर्गत 'ईगल यान' चंद्रावर उतरवले आणि चंद्रावर पाऊल ठेवण्याचा मान निल आर्मस्ट्राँग याने मिळवला.
20 जुलै हा दिवस खगोलशात्र्ज्ञ यांच्यासह सर्व जगासाठी विशेषतः अमेरिकेसाठी महत्वाचा आहे. याच दिवशी जगाच्या पाठीवर चंद्रावर जाण्याचे मानवाचे स्वप्न पूर्ण झाले. अमेरिकेने चंद्रावर जाण्याचा यशस्वी प्रयोग केला. 20 जुलै 1969 रोजी अपोलो मोहीम यशस्वी झाली. ईगल यानातून निल आर्मस्ट्राँग याने चंद्रावर पाऊल ठेवले. 16 जुलै 1969 मध्ये हे यान येथून चंद्राकडे झेपावले. चार दिवसांनी यान चंद्रावर पोहोचले. काही तास निल आर्मस्ट्राँग, मायकल कॉलेन्स या दोघांनी चंद्रावर पाय ठेवले. 1962 ते 1969 या काळात अमेरिकेने अपोलो या मोहिमेचे 10 प्रयोग केले. यामध्ये अपोलो दहा या प्रयत्नात चंद्राच्या जवळ जाऊन उतरण्याची जागा निश्चित केली. 11 व्या प्रयोगाला त्यांना यश मिळाले. त्यामुळे 20 जुलै 1969 हे वर्ष सर्वात महत्वाचे मानले जाते. या ऐतिहासिक घटनेला 20 जुलै 2019 ला पन्नास वर्षे झाली. भारत याच मोहिमेचा नवा अध्याय जोडण्यास सज्ज असल्याने सर्व भारतीयांचे डोळे लागले ते चंद्रयान 2 मोहिमेकडे.